Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कट्टा महावियालयातील करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी कु. प्राची परब हिची निवड.

कट्टा महावियालयातील करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी कु. प्राची परब हिची निवड.

मालवण | प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात करिअर कट्टाच्या करिअर संसदेचा पदग्रहण समारंभ पार पडला या करिअर संसदेच्या मुख्यमंत्री पदी कु. प्राची संभाजी परब या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित आमच्या डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथे करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत विविध करिअर संबंधी उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर कट्टा विभागांतर्गत करिअर संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथ ग्रहण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या करिअर संसदेत पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कु. प्राची संभाजी परब (मुख्यमंत्री), कु. संचिता मंगेश करावडे (नियोजन मंत्री), कु. ऐश्वर्या संभाजी परब (कायदे व शिस्तपालन मंत्री), कु. साहिल आनंद पालव (सामान्य प्रशासन मंत्री), कु. पूजा प्रदीप लाड (माहिती प्रसारण मंत्री), कु. राजकुमार आनंद लोखंडे (उद्योजकता विकास मंत्री), कु.ओम भास्कर टेमकर (रोजगार स्वयंरोजगार मंत्री), कु. भक्ती भाऊ घाडी (कौशल्य विकास मंत्री), कु. सलोनी किशोर पवार (संसदीय कामकाज मंत्री), कु. साक्षी संदीप पालव (महिला व बालकल्याण मंत्री), कु. हर्ष ज्ञानदेव पेडणेकर (सदस्य)
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी व उपप्राचार्य प्रा. रविंद्र गावडे यांच्या हस्ते करिअर कट्टा डायरी, बॅच व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या "आयएएस आपल्या भेटीला" व "उद्योजक आपल्या भेटीला" व विविध ऑनलाइन ॲडऑन कोर्सेस यांची माहिती देऊन या ऑनलाइन मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थांना केले.
महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभाग प्रमुख प्रा. श्रुती कुंभार व विभाग सहाय्यक प्रा. कांचन खानोलकर या विभागाचे कामकाज पाहत आहेत.

rapan bottom