Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून तळाशिल किनारपट्टी संरक्षित होणार!

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून तळाशिल किनारपट्टी संरक्षित होणार!

उधाणाचा फटका बसून समुद्राने गिळंकृत केलेल्या किनारपट्टीला तात्काळ संरक्षण देणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाहाणी दरम्यान दिली माहीती

मालवण : मुसळधार पाऊस व समुद्राला असलेल्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे. तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये दहा ते पंधरा फूटाचे अंतर राहिले आहे. यामुळे तळाशील भागाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टी भागाची भर पावसात पाहाणी केली. ग्रामस्थांच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली.

दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना संपर्क साधून माहिती दिली. यावेळी निलेश राणे म्हणाले तात्काळ उपाययोजना करा. आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. किनारपट्टीचे संरक्षण आणि ग्रामस्थांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्या दृष्टीने उपाययोजना त्वरित व्हाव्यात असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार दत्ता सामंत यांनी तातडीने उपाययोजना बाबत निर्णय घेतला आहे. बुधवार पासून उपाययोजना सुरु केल्या जाणार आहेत. अशी माहिती दत्ता सामंत यांच्या वतीने देण्यात आली आहे.

rapan bottom