दादा साईल यांची अध्यक्षपदी निवड
निलेश जोशी | कुडाळ : सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, कुडाळ आगाराची सन २०२५/२६ ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, कुडाळ आगाराच्या अध्यक्षपदी दादा साईल यांची निवड करण्यात आली आहे.
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत आगार सचिव मिथुन बांबुळकर यांनी हि कार्यकारिणी जाहीर केली . सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, कुडाळ आगाराच्या अध्यक्षपदी दादा साईल तर उपाध्यक्षपदी जयेश चिंचळकर,कार्याध्यक्षपदी सुनील बांदेकर,सचिवपदी मिथुन बांबुळकर व सल्लागारपदी रुपेश कानडे व ऍड. राजीव कुडाळकर यांची निवड करण्यात आली आहे. .सहसचिव पदी समीर कदम, खजिनदारपदी दिनेश पाटकर, सहखजिनदारपदी रघुनाथ तेंडोलकर, संघटक सचिवपदी संतोष पालव , महिला संघटक श्रीम. सोनाली तेरसे ,प्रसिद्धी सचिव शंकर बांदेकर, सदस्यपदी विनायक प्रभू , विजय म्हाडगूत, नागेश चव्हाण, तसेच विभा. कार्य. सदस्यपदी. प्रशांत गावडे, संजय वरक, तुषार गवंडे यांची निवड करण्यात आली आहे.

