Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सेवा शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट

सेवा शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट

कुडाळ : सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाच्या कुडाळ आगार युनिटने कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. या वेळी संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, आगार उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, सल्लागार रुपेश कानडे, कार्याध्यक्ष सुनील बांदेकर, सचिव मिथुन बांबुळकर, सहसचिव समीर कदम, शैलेश धामापूरकर, संजय वरक, सूर्यकांत पडवळ, निलेश कसालकर, प्रसिद्ध सचिव शंकर बांदेकर, नागेश चव्हाण उपस्थित होते.

कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेऊन नवीन ड्युटी अलोकेशन बाबत चर्चा केली. या चर्चेत कुडाळ आगारातील चालक वाहकांच्या कर्तव्याबाबतच्या नवीन वेळापत्रकांबाबत सखोल चर्चा झाली तसेच या वेळापत्रकातील मालवण व कुडाळ आगाराच्या फेऱ्या अदलाबदल केल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असल्याने याबाबत विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्याकडून योग्य ते बदल करून जेणेकरून चालक, वाहक व प्रवासी यांच्यावर या वेळापत्रकाचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याबरोबरच ग्रुप अलोकेशन हे संघटना पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून करावे अन्यथा त्याला सेवाशक्ती संघटनेचा विरोध राहील असे आगारप्रमुखांना सांगितले.

देवगड, कोरजाई फेऱ्या वारंवार रद्द करण्यात येत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी आपले भ्रमणध्वनी कायमस्वरूपी चालू ठेवावेत अशा सूचना देण्यात आल्या. वारंवार एकाच कर्मचाऱ्याला एकच ड्युटी न लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. कट ऑफ लिस्ट प्रमाणे ओव्हर टाईमच्या ड्युट्या लावण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. आगार व्यवस्थापक यांनी याबाबत सकारात्मक चर्चा केली आपल्या स्तरावरील सूचनांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन देत विभाग नियंत्रक व
विभागीय वहातूक अधिकाऱ्यांची चर्चा करून इतर बाबींसुद्धा सुरळीत होतील असे सांगितले.

rapan bottom