Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्याने दखल

आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्याने दखल

ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी बोलावली उच्चस्तरीय आढावा बैठक

वीज समस्या बाबत योग्य त्या उपाययोजना राबवण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

मुंबई : आमदार निलेश राणे यांची विधिमंडळातील दमदार कामगिरी महाराष्ट्र अनुभवत असताना त्यांच्या मागण्यांची दखल विधिमंडळ व मंत्रालय स्तरावर तात्काळ घेतली जात आहे. सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी वीज समस्या बाबात प्रश्न उपस्थित केले. त्याची गांभीर्याने तात्काळ दखल घेत चालू अधिवेशनातच ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी बैठक बोलावली. महत्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व पाहता मालवण कुडाळला निश्चितच हक्काचे नेतृत्व मिळाले आहे. जनतेचा आवाज विधिमंडळात पोहचत आहे. जनतेला न्याय मिळतं आहे. अश्या भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल ऊर्जा विभागाने घेतली. राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली.

या बैठकीत वीज समस्या बाबत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

आज पार पडलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार व माजी मंत्री श्री. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom