Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण | सरपंच आरक्षण निश्चित

मालवण | सरपंच आरक्षण निश्चित

३२ ग्रामपंचायत महिला आरक्षित : तहसीलदार वर्षा झालटे यांची माहिती

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यात 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

रघुनाथ देसाई सभागृह मालवण येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शालेय विद्यार्थिनी ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार प्रिया हर्णे-परब, सहाय्यक महसूल अधिकारी एम. जी. गवस, मंडळ अधिकारी पी. डी. लोबो, संतोष गुरखे, डी. व्ही. शिंगारे, महसूल सहाय्यक आनंद तोंडवळकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, ग्राम महसूल अधिकारी कोतवाल तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आरक्षण बाबत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना व शंकांना तहसीलदार वर्षा झालटे यांनी शासन निर्णय, तरतुदी व नियमानुसार परिपूर्ण माहिती दिली.

ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

अनुसूचित जाती महिला आरक्षित गोळवण, राठीवडे
तर अनुसूचित जाती तळगाव, बांदिवडे बुद्रुक, त्रिंबक

अनुसूचित जमाती महिला आरक्षित वराड

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित

वायंगवडे, मसदे-चुनवरे, वेरळ, पेंडूर-खरारे, तिरवडे, कोळंब, वायरी-भुतनाथ, पोईप, नांदरुख

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग

आंबडोस, बांदिवडे खुर्द कोईळ, देवबाग, काळसे, खोटले, मिर्याबांदा-सर्जेकोट, गोठणे, हेदूळ, चौके

  • सर्वसाधारण (खुला) महिला आरक्षित

वडाचापाट, मर्डे, बुधवळे-कुडोपी, असगणी, आंबेरी, हिवाळे, रेवंडी, ओवळीये, देवली, मालोंड, रामगड, असरोंडी, धामापूर, श्रावण, कुंभारमाठ, कांदळगाव, कातवड, निरोम, कुणकावळे, सुकळवाड

  • सर्वसाधारण (खुले)

तोंडवळी, बीळवस, हडी, महान, शिरवंडे, साळेल, आनंदव्हाळ, कार्लाचाव्हाळ, चाफेखोल, मठबुद्रुक, किर्लोस, वरची गुरामवाड, चिंदर, माळगाव, आडवली-मालडी, देऊळवाडा, पळसंब, तारकर्ली-काळेथर, आचरा, घुमडे, वायंगणी, नांदोस
अश्या प्रकारे सरपंच आरक्षण निश्चित झाले आहे.

फोटो : तहसीलदार वर्षा झालटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थिनी ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

rapan bottom