Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम व्हॅन १५ जुलै रोजी मालवण ग्रामीण रुग्णालयात…

कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम व्हॅन १५ जुलै रोजी मालवण ग्रामीण रुग्णालयात…

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्ग जन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामिण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णांची तपासणी करणार आहे.

सदरील कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन दि.०९ जुलै २०२५ ते एक महिना कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हामधील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्करोग संशयीत लाभार्थ्यांची तपासणी करणार आहे. मा.श्री. अनिल पाटील (भा.प्र.से) जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सदरील शिबिरास भेट देवून कामकाजाची पहाणी केली. सदर व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणीसह सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.

कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनचे तालुकानिहाय शिविरांच्या ठिकाणाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

भेटीचा दिवस व तारीख

दि. 15/07/2025 मंगळवार - ग्रामिण रुग्णालय मालवण

खालील लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मधील तज्ञ डॉक्टर्स
यांच्यामार्फत तपासणी करून घ्यावी.

  • ३ आठवड्यापेक्षा अधिक तोंड किंवा जीभेवर घाव /३ आठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला
  • तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा आणे/तोंड उघडायला त्रास
  • स्तनांमध्ये गाठ / स्तनाच्या आकारात बदल
  • स्तनाग्रामधून (निप्पल) पू किंवा रक्तस्त्राव
  • मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव
  • मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होण
  • शारिरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे
  • योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.

कर्करोगाचे संकेतः-

१) शरीरातील कोणत्याही अवयवामध्ये सुज येणे

२) तीळ, मस्सा यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे.

३) न भरणारी जखम

४) सतत ताप किंवा वजनात घट होणे.

५) ४ आठवड्‌यापेक्षा अधिक काळची अंगदुखी

आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेतील सदरील तपासणीच्या तारखांची माहिती आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आपली कर्करोगाविषयी तपासणी करुन घ्यावी असे जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग विभागावमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

rapan bottom