मालवण : डॉ. कुडाळकर हायस्कूल, वायरी, मालवण येथे श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन आणि नंबर वन निर्धार न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गा" चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा मार्गदर्शन वर्ग शुक्रवार, १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता डॉ. कुडाळकर हायस्कूल, वायरी, मालवण येथे होणार आहे. या मार्गदर्शन वर्गासाठी श्री. सत्यवान यशवंत रेडकर (संस्थापक - तिमिरातून… तेजाकडे….) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी योग्य दिशा मिळणार आहे.
या मार्गदर्शन वर्गात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले नाव आणि मोबाईल क्रमांक ९४०४३४४६०१ या क्रमांकावर मेसेज करून आपली नोंदणी करावी.
डॉ. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळा, मालवणच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी नितीन साटलकर यांनी या मार्गदर्शन वर्गासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

