मिहिरा स्पोर्ट्स परुळे उपविजेता
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
मालवण | प्रतिनिधी : देवली गाव आयोजित देवली चषक 2025 भव्य पावसाळी एक गाव एक संघ रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली. महापुरुष रेवतळे मालवण संघ विजेता तर मिहिरा स्पोर्ट्स परुळे संघ उपविजेता ठरला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण संपन्न झाले.
विजेत्या रेवतळे संघाला सरपंच शाम वाक्कर व दीपक चव्हाण पुरस्कृत 25 हजार व निलेश मांजरेकर पुरस्कृत देवली चषक 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. तर उपविजेता परुळे संघाला बबन पेंटर पुरस्कृत 15 हजार व विक्रांत नाईक पुरस्कृत देवली चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज सुनिल मालवणकर रेवतळे, गोलंदाज नितेश मांजरेकर रेवतळे, क्षेत्ररक्षक कुणाल केळुसकर तारकर्ली, मालिकावीर अनिकेत वांयगणकर परूळे यांना सन्मानित करण्यात आले. सर्व पारितोषिक रामचंद्र चव्हाण यांनी पुरस्कृत केली. तर दीपेश चव्हाण यांच्याकडून सर्व चषक पुरस्कृत करण्यात आले. स्पर्धेसाठी लागणारे चेंडू अतुल चव्हाण यांनी पुरस्कृत केले.
स्पर्धेत पंच म्हणून नितीन जबडे यांनी काम पाहिले. तर समालोचन आवाज सिंधुदुर्गचा सर्व सदस्य यांनी केले. यावेळी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समलोचक यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. यात बेस्ट ऑफ मालवण विजेता तर रेस्ट ऑफ सिंधुदुर्ग उपविजेता ठरला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह तालुकाप्रमुख राजा गावडे, सरपंच शाम वाक्कर, विजय चव्हाण, शिवदास चव्हाण, दीपक चव्हाण, गुरुनाथ पाटकर, आप्पाजी चव्हाण, दाजी चव्हाण, मंदार लुडबे, रुपेश आळवे, संदेश वेतुरेकर, दत्तप्रसाद चव्हाण, सचिन आचरेकर, ओमकार धुरी, अजय चव्हाण, महेश नाईक, राजू चव्हाण, वैभव चव्हाण, तुषार चव्हाण, अंतुले चव्हाण यांसह देवली ग्रामस्थ उपस्थित होते.
▪️ अमित खोत | मालवण

देवली चषक २०२५ | महापुरुष रेवतळे मालवण विजेता
