मालवण : लायन्स क्लब ऑफ मालवणच्या नूतन अध्यक्ष अनुष्का चव्हाण व त्यांच्या कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवार, दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. माजी मल्टीपल कौन्सिल चेअरमन एमजेएफ द्वारका जालान यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.


नूतन संचालक मंडळामध्ये अध्यक्ष-अनुष्का चव्हाण, माजी अध्यक्ष महेश अंधारी, सचिव मनाली दळवी, खजिनदार पुनम चव्हाण, प्रथम उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, द्वितीय उपाध्यक्षा-स्वप्नाली नेरुरकर, तृतीय उपाध्यक्षा अंजली आचरेकर, सहसचिव-उदय घाटवळ, सहखजिनदार-विराज आचरेकर, टेल ट्रिस्टर-जयश्री हडकर, टेमर-मिना घुर्ये, स्वच्छ भारत-डॉ. प्रिया रिवणकर, लायन क्रेस्ट-मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन स्नेहा जामसंडेकर, एल.सी.आय.एफ.एफ. चेअरमन-दिक्षा गावकर, पीआरओ मेघःश्याम शंकरदास, जीएसटी चेअरमन राधिका मोंडकर, जीएमटी चेअरमन वैशाली शंकरदास, जीएलटी चेअरमन डॉ. हरिष परुळेकर, कॅम्पेन १००-रुपा कांदळगावकर, अॅक्टिव्हिटी चेअरमन ऋग्वेदा धामापूरकर, हेल्थ अवेरनेस-नंदिनी गावकर, लिडरशीप मनिषा गावकर, साईट फर्स्ट डॉ. दर्शन खानोलकर, युथ प्रोग्राम-सहदेव बापार्डेकर, फड रेजिग-शाम नार्वेकर, डायबेटीक अवरनेस-शांती पटेल, बुलेटीन एडिटर श्वेता यादव, सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी अध्यक्ष महेश अंधारी, खजिनदार पल्लवी खानोलकर, सचिव फॅनी फर्नाडीस यांनी केले आहे.
▪️अमित खोत | मालवण

