मालवण : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवतळे मालवणचा श्रीवर्धन संदीप पारकर हा शहरी सर्वसाधारणमधून तालुक्यात प्रथम आला.
शाळेतील शिक्षक व पालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळविले आहे. याच वर्षी त्याने गणित प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोल्डन कॅटेगरी प्राप्त केली आहे. या दुहेरी यशामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

