युवा सेना कॉलेज कक्ष युनिट ही प्रत्येक महाविद्यालयात स्थापना होणार !
युवासेना कुडाळ मालवण मतदार संघाची आढावा बैठक कुडाळ येथे संपन्न
युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व कोकण निरीक्षक राहुल अवघडे यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : युवासेना सिंधुदुर्ग (कुडाळमालवण) विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक कुडाळ शासकीय विश्रामगृह येथे युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व कोकण निरीक्षक राहुल अवघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवती सेना उपजिल्हाप्रमुख संतोषा नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर, कुडाळ शहरप्रमुख अनंत धडाम, उपतालुका प्रमुख बाळा सावंत, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, युवती सेना कुडाळ तालुका प्रमुख गायत्री गोलम, उपतालुका प्रमुख दीपाली कानसे, अक्षय तावडे, अजित राणे, वैभव मेस्त्री, रोहित संजय अटक, आकाश मळेकर, लवु कदम, साईराज दळव, विनोद सावंत, प्रथमेश कांबळी, कुमार राठोड, योगेश परब, अभी लाड, राहुल बागवे, धनंजय परब, दयानंद प्रभुदेसाई, प्रीतम गावडे, स्वरूप प्रकाश वाळके यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने युवासेना व युवती सेनेची रिक्त असलेली पदे लवकरत लवकर नियुक्त करणे. नियुक्त्या करतं असताना युवासेना व युवती सेनेने स्थानिक आमदार निलेशजी राणे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत आणि महिला जिल्हा प्रमुख दीपलक्ष्मी पडते यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रम व युवा सेनेच्या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करणे.

जे पदाधीकारी सक्रियपणे कार्यरत नसतील त्याच्या जागी नव्या पदाधिकारी यांना संधी देणे. युवा सेना कॉलेज कक्ष युनिट ची प्रत्येक महाविद्यालयात स्थापना करणे. गाव तिथं युवा आणि युवा तिथे युवा सेना या उपक्रमातुन प्रत्येक गावात, तालुकामध्ये आणि जिल्हात महत्वाच्या ठिकाणी युवा सेनेचा फलक लावणे. या विषयांवर चर्चा करण्यात आली.
आमदार निलेश राणे यांसह वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं असताना युवासेना संघटन गावागावात मजबूत करणे. सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन गाव तिथे युवा आणि युवा तिथे युवासेना या नुसार काम सुरु आहे.. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम सुधीर साळसकर यांनी दिली.


