Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष…

किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष…

किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याचा मालवणात आनंदोत्सव

मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांनी 350 वर्षा पूर्वी मालवण समुद्रात उभारणी केलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाला. हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुका प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे शिवभक्तांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत स्वराज्य ढोल ताशां पथकाचा आसमंत दणाणणारा गजर व गुलाल उधळीत, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. घोषणानी परिसर दाणाणून गेला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. यामध्ये मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याने मालवणात आनंदाचे वातावरण असून पार्श्वभूमीवर प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजऱ्या केलेल्या या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज कि जय… जय भवानी जय शिवाजी… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय… हरहर महादेव… अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर शिवप्रार्थना झाली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, भाजप नेते अतुल काळसेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरसकर, अशोक सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, विकी तोरसकर, भाजपा महिला शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, पूजा सरकारे, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, दादा वेंगुर्लेकर, प्रमोद करलकर, रत्नाकर कोळंबकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, भालचंद्र राऊत, महेश मांजरेकर, डॉ. कमलेश चव्हाण, दादा वाघ, दाजी सावजी, आर. एन. काटकर, राजेंद्र आंबेरकर, अमिता निव्हेकर, विशाल ओटवणेकर, हितेश वायंगणकर, मंडळ अधिकारी पीटर लोबो, तलाठी श्री. राठोड, बंदर विभागाचे श्री. कदम व इतर उपस्थित होते. उपस्थितांना विजय केनावडेकर यांनी जिलेबी देत आनंद साजरा केला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, भाजपा नेते अतुल काळसेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी आभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे सांगत आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे. गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवभक्तांची तपश्चर्या आज फळास आली आहे, असे सांगितले.

rapan bottom