Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन नाही ;आरोपीला २ वर्ष साधी कैद

ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन नाही ;आरोपीला २ वर्ष साधी कैद

ऍड. गायत्री उर्फ राखी मालवणकर यांचा यशस्वी युक्तिवाद

निलेश जोशी | कुडाळ : कबुल करूनही महिला तक्रारदाराला घरासाठी सागवानी दरवाजे आणि दरवाजाच्या लाकडी चौकटी तयार करून दिल्या नाहीत. तसेच या कामासाठीचे ६३ हजार रुपये पोहोच असून सुद्धा काम करून दिले नाही. तसेच या प्रकरणी ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी जिल्हा ग्राहक आयोगाने आरोपी परशुराम एकनाथ मेस्त्री यास ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ चे कलम ७२ अन्वये दोषी ठरवून त्याला दोन वर्षे साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तक्रारदाराच्या वतीने ऍड. गायत्री उर्फ राखी मालवणकर यांनी युक्तिवाद केला.
याबाबत ऍड. गायत्री उर्फ राखी मालवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार उज्वला वरस्कर यांचेकडून विरूध्दपक्ष परशुराम एकनाथ मेसत्री यांनी 3 लाकडी चौकट व 3 सागवाणी दरवाजे बनवून देण्यासाठी रक्कम रू. 63,000/- इतकी रक्कम स्विकारली होती. मात्र रक्कम स्विकारून देखील तक्रारदार वरस्कर यांना 3 लाकडी चौकट व 3 सागवाणी दरवाजे बनवून दिले नाहीत, म्हणून तक्रारदार उज्वला वरस्कर यांनी विरूध्दपक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री यांचे विरूध्द ग्राहक मंचाकडे आपली तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीचे कामी ग्राहक मंचाने विरूध्दपक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री यांचेविरूध्द आदेश करून तक्रारदार हिचेकडून घेतलेली रक्कम 63,000/- अदा करण्याचे व सदर रक्कमेवर तक्रार दाखल झाल्यापासून पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करणेबाबत देखील आदेश केला. तसेच नुकसान भरपाईपोटी रू. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रू. 15,000/- अशी रक्कम तक्रारदार हिस देणेबाबत आदेश केला होता व सदर आदेशाचे पालन निकालापासून ४५ दिवसांच्या मुदतीत करणेबाबत आदेश पारित केला होता.
त्यानंतर देखील विरूध्दपक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री याने तक्रारदार उज्वला वरस्कर हिस मे. मंचाच्या आदेशाप्रमाणे मुदतीत रक्कम न दिल्याने तक्रारदार उज्वला वरस्कर हिने सदरची रक्कम वसूल होऊन मिळणेकरीता विरूध्दपक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री याचे विरूध्द ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 71 व 72 अन्वये दाद मागितली होती व दरखास्त व फौजदारी फिर्याद दाखल केली होती. मात्र सदर दरखास्तीच्या व फौजदारी फिर्यादीच्या सुनावणीस देखील विरूध्द पक्ष परशुराम एकनाथ मेस्त्री हा वारंवार गैरहजर राहिला. तसेच त्याचे विरूध्द नाँन बेलेबल वाँरंट असूनही मे. कोर्टात हजर रहाण्यास टाळाटाळ केली. सबब, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 392(6) आणि 392(7) अन्वये आणि Sharad Jethalal Salva Vis State of Gujrat, Cr.M.A.NO-19862/2015 या प्रकरणामध्ये मा. गुजरात उच्च न्यायालयाने पारित केलेल्या न्यायनिर्णयातील निष्कर्षाच्या आधारे आरोपीच्या गैरहजेरीमध्ये आरोपीस शिक्षा सुनाविण्याचा आदेश सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्रीम. इंदुमती मलुष्टे व सदस्य योगेश खाडीलकर यांनी पारित केला. तसेच या आदेशाचे अंमलबजावणीकरिता आरोपी परशुराम एकनाथ मेस्त्री याच्या विरोधात अटक वॉरंट पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचेमार्फत कणकवली पोलीस ठाण्यामध्ये पाठविण्यात येऊन परशुराम एकनाथ मेस्त्री यांस जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. या फिर्यादीचे कामी फिर्यादीचेवतीने ॲड. गायत्री उर्फ राखी मालवणकर, कणकवली यांनी काम पाहिले.

rapan bottom