आम्हाला गावात राजकारण नको त्यामुळे यापुढे कोणतेही प्रत्तुत्तर नाही
शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गांवकर यांनी संतोष गांवकर यांना सुनावले
चिंदर : चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुक नंतर आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. संतोष गांवकर यांनी केलेल्या टिकेला शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गांवकर यांनी प्रत्तुत्तर दिले आहे. संतोष गांवकर 2021 चिंदर ग्रामपंचायत निवडणुकीत तुमच्या वार्ड मधील तीनही सदस्य उबाठा शिवसेनेचे निवडून आले. तुमच्या वार्डात तुमचे नेतृत्व मान्य नसल्याचे चित्र निवडणुक निकालातून दिसून आले. असे असताना 2024 लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तालुकाध्यक्ष यांनी मालवण शहराची जबाबदारी तुमच्याकडे दिली. निकालातून सर्वकाही दिसलें. असे असताना आता चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसची साथ लाभली. हे तुमचे विरोधी राजकारण समोर येऊ नये यासाठी पाच लाख उमेदवाराच्या घरी कोदे यांचे आका घेऊन गेले असे बिबुडाचे आरोप आपण करता. जनतेची दिशाभूल करता.
उपसरपंच निवडणूक पूर्वी गावातील काही उबाठा चे नेते आमचे जिल्हाप्रमुख यांच्या घरी गेले. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे साथ देण्यास आमच्या जिल्हाप्रमुख यांनी नकार दिला. यातून आमचे जिल्हप्रमुख कश्या प्रकारे पक्ष हित प्राधान्य देतात हे स्पष्ट झाले.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकास हेच आमचे लक्ष आहे. प्रसंगी आमचे जिल्हाप्रमुख राणे साहेबांप्रमाणे खिशात हात घालून जनसेवा करतात. निवडणुकीत येणाऱ्या पैशांवरचे राजकारण आमच्या पक्षात चालत नाही. त्यामुळे तुम्ही मंदिरात या निवडणुकीत कोणी कोणी किती पैसे घेतले काय केले हे सर्वच उघड होईल.
आता जास्त काही बोलणार नाही. गावात राजकारण आम्हाला नको. त्यामुळे आता कोणत्याही आरोपाना उत्तरही देणार नाही. तुमचे आरोप प्रत्यारोप तुमच्याकडे ठेवा. असे मंगेश गांवकर यांनी सांगितले. एकूणच आपल्या चर्चेतून उत्तर देताना आरोपाना यापुढे पुर्ण विराम देत असल्याचे सांगितले.

