Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सगळंच पुराव्यासहित बाहेर काढू

सगळंच पुराव्यासहित बाहेर काढू

संतोष गांवकर यांचा मनोज हडकर यांना सूचक इशारा

चिंदर : चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुक नंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. निवडणुक निकालाने पैशाचा माज उतरला असे विधान भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले होते. त्याला प्रत्तूत्तर देताना माजी सरपंच संतोष कोदे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष काँग्रेस उपसरपंचांच्या विजयाचा आनंद साजरा करतं आहेत. अशी टिका केली होती. त्याला प्रत्तूत्तर देताना चिंदर भाजपा प्रभारी संतोष गांवकर यांनी संतोष कोदे यांच्यावर टिका केली. उपसरपंच निवडणुक पूर्वी महेंद्र मांजरेकर यांच्या घरी पाच लाख घेऊन पाळणा झोलवणाऱ्या कोदे यांच्या आक्काचा डाव उधळला. असे सांगण्यात आले. त्यावर
मनोज हडकर यांनी संतोष गांवकर यांच्यावर टिका केली होती. त्यावर संतोष गांवकर यांनी हडकर यांना जोरदार प्रत्तुत्तर दिले आहे.

संतोष गांवकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, स्वतःच्या आकाच्या पाठीत ज्याने खंजीर खुपसला त्याने राजकीय पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या माणसावर किती बोलावे? महसूल यंत्रणेचा एक * म्हणजे मनोज हडकर. स्वतःच्या वार्डात ज्याचा दारुण पराभव झाला अशा व्यक्तीने माझ्यावर टीका करणे म्हणजे हास्यास्पद आहे. माझे वडील दहा वर्ष चिंदर ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून येत होते. माझी काकी मनोज हडकर यांच्याच वॉर्ड मधून धोंडी चिंदरकर यांच्या आशीर्वादामुळे व माझ्या घरातील राजकीय पुण्याईमुळे बिनविरोध निवडून येऊन सरपंच झाली. त्याही अगोदर माझ्याच वॉर्डमध्ये यांचे आक्का तालुक्याचे नेतृत्व करत असताना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता माझ्या वॉर्डातील जनतेने अपक्ष म्हणून निवडून दिले. माझ्या राजकीय कारकीर्द विषयी बोलण्याची मनोज हडकर यांची पात्रता सुद्धा नाही. खरं माझी याच्यावर बोलण्याची इच्छा सुद्धा नव्हती. परंतु ज्या माणसाने हे सर्व राजकारण घडवून आणलं त्या माणसाला सुखा सुखी सोडणं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणूनच बोलतो आहे. ज्याने संतोष कोदे यांच्या सारख्या चांगल्या माणसाला आज राजकारण करून पश्चाताप करायला लावलं. सर्व गोष्टी इकडेच्या तिकडे करून करून स्वतःच्याच आकाला तोंडावर पाडलं. याचा विचार आक्कांनी करावा आणि माझे मित्र संतोष कोदे यांनीही करावा. मंदिर आणि देवळाचा विषय आला म्हणून सांगतो संतोष कोदे यांनी माझ्यासोबत कधीही मंदिरात बसावं. मनोज हडकर यांनी आपल्या पाठीत कसा खंजीर खुपसला हे सगळ्या पुराव्यासहित त्यांच्यासमोर उलगडा करेन. शेवटी एकच सांगतो 33 कोटी देव गायीच्या पोटात मानून आपण त्यांना देव मानतो. आपली प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा आहे. आपण प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठेवली पाहिजे ही आमची धारणा आहे. मात्र काहींचे वेगळे आहे. अश्या व्यक्तींवर विश्वास ठेवून किती राजकारण करावं हे ज्याला त्याला आणि यांच्या आक्काना समजलं पाहिजे. तूर्तास एवढेच. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. यापेक्षाही जास्त काही या व्यक्तीबद्दल लिहू शकतो. वेळ आली की तेही बोलावे लागेल. असे भाजपा चिंदर प्रभारी संतोष गांवकर यांनी स्पष्ट केले.

rapan bottom