Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्रिपेड वीज मीटरच्या वाढीव बिलांमुळे पोईप येथील ग्रामस्थ संतप्त..

प्रिपेड वीज मीटरच्या वाढीव बिलांमुळे पोईप येथील ग्रामस्थ संतप्त..

संजय माने | पोईप : प्रिपेड वीज मीटरमुळे वाढीव वीज बिले आल्याने संतप्त बनलेल्या पोईप खालची पालव वाडी - बेलाची वाडी येथील ग्रामस्थांनी जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मसदे विरण येथील वीज कार्यालयात धडक देत अभियांत्यांना जाब विचारला. ग्राहकांना सांगितल्या शिवाय नवीन प्रिपेड वीज मीटर बसविले जात असून या मीटरमुळे अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिले आली असल्याने ही बिले बदलून मिळावीत, तसेच लोकांची खात्री पाटल्याशिवाय मीटर बदलू नयेत ,अशी मागणी यावेळी अनिल कांदळकर व ग्रामस्थांनी केली.

यावेळी अनिल कांदळकर यांच्यासह बाबू परब, सुभाष परब, प्रकाश पालव, धनश्री संजय पालव, नामदेव पालव, गोविंद पालव, सत्यवान पालव उपस्थित होते. तर वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता प्रमोद मारबते व लाईनमन महेंद्र घाडी उपस्थित होते.

काही वीज ग्राहकांचे वीज मीटर सांगितल्या शिवाय बदलून त्याजागी नवे प्रिपेड मीटर लावले गेले. नादुरुस्त मीटर बदलले गेल्यास हरकत नाही, मात्र, सुस्थितीत असलेले मीटर बदलून प्रिपेड मीटर का लावले गेले ? यामध्ये काही ग्राहकांच्या प्रिपेड मीटरची वाढीव वीज बिले आली आहेत. ही विजे बिले कमी करून मिळावीत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. प्रिपेड मीटर बसविण्याबाबत वीज कंपनीकडून ग्रामस्थांना समुपदेशन करण्यात यावे, ग्राहकांची प्रिपेड मीटर बाबत खात्री पटल्याशिवाय मीटर बदलू नयेत, तसेच सांगितल्याशिवाय कोणाचेही मीटर बदलू नयेत, असे यावेळी अनिल कांदळकर यांनी वीज अभियंत्यांना सांगितले.

rapan bottom