Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

तळाशील किनारपट्टीचा भूभाग समुद्राने केला गिळंकृत

तळाशील किनारपट्टीचा भूभाग समुद्राने केला गिळंकृत

तळाशील भागाला उधाणाचा फटका

आचरा : समुद्राला आलेल्या पौर्णिमेच्या उधाणाचा फटका तळाशील समुद्र किनारपट्टीला बसत आहे. तळाशील किनारपट्टीचा बंधारा नसलेल्या भागाचा अंदाजे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केल्याने तळाशील मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये दहा ते पंधरा फूटाचे अंतर राहिले आहे. यामुळे तळाशील भागाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तोंडवळी तळाशील चे माजी सरपंच संजय केळूस्कर यांनी केली आहे.

एका बाजूने खाडीने आणि दुस-या बाजूने समुद्राने वेढलेल्या तोंडवळी तळाशील भागाला पावसाळ्यात येणारया उधाणाचा कायमच फटका बसत आला आहे. समुद्राच्या बाजूने दोन टप्प्यात संरक्षक बंधारा बांधण्यात आला आहे ‌त्यामुळे काही प्रमाणात तळाशील भुभाग संरक्षित झाला असलातरी उर्वरित खाडी आणि समुद्र यामध्ये सर्वात कमी अंतर अंदाजे तीस मीटर अंतर असलेला पाचशे मिटर किनारपट्टीचा भूभाग अजूनही संरक्षक बंधारयावीना असल्याने या भागाला उधाणाचा फटका बसत आहे. पौर्णिमेला आलेल्या उधाणाचा फटका या भागाला बसला असून अंदाजे पंधरा फूट किनारपट्टीचा भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे.


तळाशील मुख्य रस्त्यापासून काही फूटावरच समुद्र येवून ठेपला आहे.त्यामुळे याभागातील घरांना धोका निर्माण झाला आहे.याबाबत माहिती देताना केळूस्कर यांनी सांगितले की तळाशील समुद्र किनारयाच्या संरक्षक बंधा-याचे काम दोन टप्प्यांत झाले आहे. उर्वरीत पाचशे मिटर संरक्षक बंधा-याची गरज आहे. सध्याच्या उधाणामुळे बंधारा नसलेल्या किनारपट्टीचा भूभाग खचत चालला आहे.यामुळे या भागातील पंधरा घरांना धोका निर्माण झाला आहे. या मोसमातील अजून काही उधाणे बाकी आहेत यामुळे तातडीने संरक्षक बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.नाहितर या भागातील घरांसोबत मुख्य रस्त्यालाही धोका निर्माण होणार आहे. तरी याबाबत लक्ष देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

rapan bottom