Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'लाखाच्या' आणि 'आका'च्या बाता फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी !

'लाखाच्या' आणि 'आका'च्या बाता फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी !

आधी चिंदर गावात स्वतःच्या वार्ड मधून ग्रामपंचायत सदस्य निवडून तरी आणा

मनोज हडकर यांनी संतोष गांवकर यांना सुनावले

पाच लाखाचा आरोप करणाऱ्या संतोष गांवकर यांनी ग्रामदेवते समोर यावे ; मनोज हडकर यांचे आव्हान

चिंदर : चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुक नंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. निवडणुक निकालाने पैशाचा माज उतरला असे विधान भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले होते. त्याला प्रत्तूत्तर देताना माजी सरपंच संतोष कोदे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष काँग्रेस उपसरपंचांच्या विजयाचा आनंद साजरा करतं आहेत. अशी टिका केली होती. त्याला प्रत्तूत्तर देताना चिंदर भाजपा प्रभारी संतोष गांवकर यांनी संतोष कोदे यांच्यावर टिका केली. उपसरपंच निवडणुक पूर्वी महेंद्र मांजरेकर यांच्या घर पाच लाख घेऊन पाळणा झोलवणाऱ्या कोदे यांच्या आक्काचा डाव उधळला. असे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता शिवसेनेचे मनोज हडकर यांनी संतोष गांवकर यांच्यावर टिका केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, संतोष गांवकर जर म्हणत असतील पाच लाख रुपये दिले असतील आक्काने तर त्यांनी ग्रामदेवतेला हात लावून सांगावे. 'लाखाच्या' आणि 'आका'च्या बाता फक्त जनतेची दिशाभूल करणे हेच संतोष गांवकर यांचे काम आहे. संतोष गांवकर आधी चिंदर गावात स्वतःच्या वार्ड मधून ग्रामपंचायत सदस्य निवडून तरी आणा. अश्या शब्दात मनोज हडकर यांनी संतोष गांवकर यांना सुनावले.

हडकर पुढे म्हणाले, प्रतिष्ठित लोकांना गावात धमकावणे, अश्या गुंडगिरी व मारहाण करणाऱ्याना आता जनता धडा शिकवणार. खोटे बोलणे आणि रेटून बोलणे हेच यांचे काम आहे. हे आता जनतेने ओळखले आहे असेही मनोज हडकर यांनी सांगितले.

rapan bottom