Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पंकज पेडणेकर यांची रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी निवड

पंकज पेडणेकर यांची रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी निवड

सचिवपदी रंजन तांबे, खजिनदारपदी चंद्रशेखर पेंडूरकर

१२ जुलैला हॉटेल जानकी येथे पदग्रहण सोहळा

मालवण | प्रतिनिधी : रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी पंकज पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी रंजन तांबे, खजिनदारपदी चंद्रशेखर पेंडूरकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा १२ जुलैला हॉटेल जानकी येथे संपन्न होणार आहे.

विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन रोटरी क्लबच्या माध्यमातुन समाजासाठी काम करतात. संस्थेचे सदस्य, मानवतेच्या भल्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित असतात. जिल्ह्यातील अनेक समस्यावर उपाययोजा आणि भविष्यातील उपाययोजना यामध्ये रोटरी क्लब चा आवर्जून सहभाग असतो.


२०२५ - २०२६ या वर्षासाठी मालवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी पंकज पेडणेकर, सचिवपदी रंजन तांबे, खजिनदारपदी चंद्रशेखर पेंडूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण सोहळा नवीन सदस्य ओळख (New Members Orientation) डिस्ट्रिक्ट ३१७० चे अध्यक्ष सुभाष साजणे यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते यांच्या उपस्थितीत १२ जुलैला सायंकाळी ठीक ६.०० वाजता कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी या ठिकाणी होणार आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी क्लब मालवणचे सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

जगभरात 35,000 पेक्षा जास्त रोटरी क्लब आहेत आणि 1.2 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. रोटरी क्लबचे सदस्यत्व, इच्छुक व्यक्तींना खुले आहे. सदस्य होण्यासाठी, काही सामाजिक निकष पूर्ण करणे आवश्यक असते.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom