Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कोदेंचे आका ५ लाखाचा पाळणा घेऊन मांजरेकरांच्या घरी तब्बल दीड तास काय करत होते?

कोदेंचे आका ५ लाखाचा पाळणा घेऊन मांजरेकरांच्या घरी तब्बल दीड तास काय करत होते?

संतोष कोदेनीच जनतेला सांगाव; चिंदर भाजपा प्रभारी यांचा बोचरा सवाल

मालवण : चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुक नंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. निवडणुक निकालाने पैशाचा माज उतरला असे विधान भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले होते. त्याला प्रत्तूत्तर देताना माजी सरपंच संतोष कोदे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष काँग्रेस उपासरपंचांच्या विजयाचा आनंद साजरा करतं आहेत. अशी टिका केली होती. त्याला प्रत्तूत्तर देताना  चिंदर भाजपा प्रभारी संतोष गांवकर यांनी संतोष कोदे यांच्यावर बोचरी टिका केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, खरंतर चिंदर उपसरपंच हे ठरल्या प्रमाणे नाटेकरच बिनविरोध बसणार होते. पण चिंदरकर गावात नाही हे बघून गावात तातडीने मीटिंग लाऊन पाठीत खंजीर खुपसण्याचं काम होत आहे हे लक्षात आल्यावर भाजपा टीम सक्रिय झाली. आणि आक्काचा डाव उधळला. तुमच्या आक्कानी धोंडी चिंदरकर यांना हलक्यात घेतल्याने नेहमी त्यांचा धोबी पछाड होत राहिला. धोंडी चिंदरकर यांचा वाद हा शिंदे गटाशी किंवा राणे कुटुंबाशी नाही. त्याचा वाद हा गटबाजीच्या जनकाशी आहे. हे जे कोणी आहेत ते राणे नाव बाजूला ठेऊन फक्त गावा गावात किमान ५० लोकांची तरी मीटिंग घेतील का ही शंका आमच्या मनात आहे. एवढ्या मोठ्या चिंदर गावात गाड्या जेवण व्यवस्था करून फक्त मोजून २४ माणसं गावातील होती. त्याच वेळी समज असायला हवी होती की गावातील लोक विकास कामाला महत्व देतात. रोख रकमेला नाही आणि मांजरेकर हे विकाऊ नाहीत तर ते सुशिक्षीत प्रामाणिक व उच्च विभूषित आहेत.

कोदे आमचे मित्र आहेत फक्त त्यांनी सांगाव की तुमची भावजय सरपंच होती तेव्हा महेंद्र मांजरेकर यांचा पाठिंबा का घेतला? याचा खुलासा करावा आणि मांजरेकर यांचा व्हिडिओ पाहून घ्यावा आणि आपले अज्ञान दूर करावे सध्या एवढेच. असे संतोष गांवकर यांनी म्हटले आहे.

rapan bottom