Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ न. प. विशेष सभेत जागा हस्तांतर मुद्द्यावरून खडाजंगी

कुडाळ न. प. विशेष सभेत जागा हस्तांतर मुद्द्यावरून खडाजंगी

उपनगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांनी केला सभात्याग

निर्णयाविना सभा चार तास राखडवल्याचा 'त्या' आठ नगरसेवकांचा आक्षेप

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ शहराचे विश्वस्त म्हणून लोकांनी निवडून दिलेल्या सत्ताधारी नगरसेवकांकडूनच शहर विकास सोडून इतर मुद्यांवरच खडाजंगी झाल्याचे चित्र आजच्या विशेष सभेत पाहायला मिळाले. कुडाळ नगरपंचायतीच्या आज झालेल्या मॅरेथॉन विशेष सभेत शासकीय जागा हस्तांतरित करण्याच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगरसेवक निलेश परब यांच्यात या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह आठ नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्या मनमानी व बेकायदेशीर वर्तनामुळे कोणतीही कार्यवाही न करता सुमारे चार तास रखडलेली आहे असे पत्र मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे देत सभात्याग केला. त्यानंतर नगराध्यक्षांनी सभेचे कामकाज पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या
कुडाळ नगर पंचायतीची हि विशेष सभा बुधवारी नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेत नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या प्राप्त अर्जानुसार सि.स. न. 3226 (स.नं 339/0) व स.नं 338/0 ही शासकीय मालकीची जागा नगरपंचायतीने ताब्यात घेण्याबाबत अर्जाचे वाचन करुन विचार विनिमय करुन निर्णय घेणे, या दुस-या विषयाला सुरूवात झाली. या चर्चेत सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक निलेश परब यांनी सहभाग घेत, आताच या जागा न.पं.कडे हस्तांतरित करुन काय करणार?, यापूर्वी पोलीस स्टेशन नजिकच्या ट्रॅगल या जागेत सुशोभिकरणासाठी ४० लाखाचा निधी आला होता, तो अन्यत्र वर्ग करण्यात आला, मग ही जागा आता न.पं.कडे हस्तांतरित कशाला करताय? असा सवाल केला. यावरून नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगरसेवक निलेश परब यांच्यात शाब्दिक खटके उडाले. नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी तुमच्या प्रभागातील खड्ड्यांवर लक्ष द्या, असा टोला नगरसेवक परब यांना लगावला त्यावर परब यांनीसुद्धा नगराध्यक्षांना प्रत्युत्तर दिले आणि वादंग निर्माण झाला.
दोघांमध्येही जोरदार शाब्दिक खटके उडाले. अन्य उपस्थित नगरसेवकांनी दोघांनाही शांत रहाण्याची विनंती केली मात्र दोघांमधील शाब्दिक चकमक सुरूच होती. त्यातच नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी नगरसेवक परब यांनी सभागृहात उच्चारलेले शब्द सभाशास्त्राला योग्य नाहीत, त्यामुळे हा सभाध्यक्षांचा अपमान आहे. त्यामुळे परब यांनी सभागृहातून बाहेर जावे अन्यथा माफी मागावी, तोपर्यंत सभेचे पुढील कामकाज स्थगित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तर नगरसेवक परब यांनी आपण कोणाचा अपमान केलेला नाही, त्यामुळे सभागृहातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका घेतली. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दुपारी बारा वाजल्यापासून सभेचे कामकाज स्थगित झाले. यावेळी अन्य काही नगरसेवकांनी दोघांनाही शांत रहाण्याची विनंती करीत नगराध्यक्षांना सभेचे कामकाज सुरू करण्याची विनंती केली. परंतू नगराध्यक्षाही आपल्या भूमिकेवर ठाम राहील्या.
दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुन्हा नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका आफरीन करोल, संध्या तेरसे व श्रेया गवंडे यांनी नगरसेवकांना सभेचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली. मात्र नगराध्यक्षा आपल्या भूमिकेवर ठाम राहील्या. नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर आणि नगरसेवक परब आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सभेचे कामकाज स्थगितच होते. दरम्यान विरोधी गटाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी नगराध्यक्षा व नगरसेवक यांच्यातील वादाच्या चर्चेत सहभाग घेत, या सभागृहात वैयक्तिक कोणाचेही हेवेदावे नको. वैयक्तिक टिका बाहेर करावी. येथे विकासकामांवर चर्चा व्हावी अशी भूमिका मांडत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

उपनगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांचा सभात्याग

नगरसेवक निलेश परब यांच्या बाजूने असलेल्या नगरसेवक निलेश परब यांच्यासह, उदय मांजरेकर, संध्या तेरसे, अक्षता खटावकर, आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी व उपनगराध्यक्ष किरण शिंदे या आठ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र सायं. ६.२० वाजता उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांच्याकडे देत सभात्याग केला. हि सभा नगराध्यक्ष यांच्या मनमानी व बेकायदेशीर वर्तनामुळे कोणतीही कार्यवाही न करता सुमारे चार तास रखडलेली आहे. या काळात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित असूनही, ना कोणतेही विषय चर्चेस मांडण्यात आले, ना सभेचा तहकूब करण्याचा अधिकारिक निर्णय जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे नगराध्यक्ष यांनी जबाबदारी टाळत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, तसेच मुख्याधिकाऱ्यानी देखील आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्या झटकत मौनव्रत धारण केलेले आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. ही संपूर्ण कारवाई लोकशाहीविरोधी व नियमबाह्य असून नगरसेवकांचा व नागरिकांचा अपमान करणारी आहे. जशा प्रकारे पद्धतशीरपणे सभेचे कामकाज न होणे व प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर न मिळणे, हे संपूर्णपणे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची जबाबदारी आहे. यामुळे आम्ही, सही करणारे नगरसेवक, आपली तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत आणि याप्रकरणी संबंधितांकडे तक्रार दाखल करणार आहोत. म्हणूनच आम्ही या सभेतून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या बेकायदेशीर व मनमानी कारभाराचा निषेध नोंदवून सभा त्याग करीत आहोत, असे ८ नगरसेवकांनी सही केलेल्या या पत्रात नमूद केले आहे. हे नगरसेवक सभागृहातून बाहेर गेल्यानंतर नगराध्यक्षांनी सभेचे कामकाज पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी अरविंद नातू, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश परब, अभी गावडे, अॅड.राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, मंदार शिरसाट, नगरसेविका आफरीन करोल, अक्षता खटावकर, संध्या तेरसे, श्रेया गवंडे, सई काळप, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी आदींसह खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom