Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुन्हा मालवण वासियांच्या सेवेत

कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुन्हा मालवण वासियांच्या सेवेत

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा महत्वपूर्ण पाठपुरावा : शहरप्रमुख दीपक पाटकर यांची माहिती

अमित खोत | मालवण : कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून ओळख लाभलेले डॉ. बालाजी पाटील पुन्हा मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेत रुजू होत आहेत. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुन्हा एकदा मालवण वासियांच्या सेवेत येत आहेत. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाठपुरावा महत्वाचा ठरला. अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी दिली आहे.

2012 ते 2017 आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा बजावून 2017 साली डॉ. बालाजी पाटील मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्त झाले होते. आपल्या तत्पर सेवेतून अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले. अनेक रुग्णांसाठी डॉ. पाटील देवदूत ठरले. कोरोना काळातील त्यांची सेवा अतिशय महत्वपूर्ण ठरली. प्रसंगी 24 तास ते तत्पर राहिले. पाच वर्षे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा बजावून 2022 साली सेवांतर्गत उच्च शिक्षणासाठी सोलापूर येथे त्यांची बदली झाली. त्यांच्या पाच वर्षे सेवा काळाचा यथोचित सत्कार सन्मान मालवण वासियांना केला होता. त्यावेळी अनेकांनी पुन्हा डॉ. बालाजी पाटील मालवण रुग्णालयात यावेत अश्या भावना व्यक्त केल्या होता. आता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून डॉ. बालाजी पाटील पुन्हा एकदा मालवण वासियांच्या सेवेत रुजू होत आहेत. बुधवारी सायंकाळी ते पदभार स्वीकारतील अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर यांनी दिली आहे.

डॉक्टर बालाजी पाटील यांना मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नियुक्ती दिल्याबद्दल दीपक पाटकर यांनी शासनाचे तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे मालवण वासियांतर्फे आभार व्यक्त केले आहेत.

rapan bottom