मनःपूर्वक अभिनंदन : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : नयोमी हिने २०२० मध्ये पहिल्यांदाच यूपीएससीची परीक्षा देऊन १६२ वा क्रमांक पटकावत यश संपादन केले. कणकवलीमधील पिसेकामते, फळसेवाडी हे नयोमी साटम यांचे मूळ गाव असून त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले. सोलापूर आणि चंद्रपूर येथे कर्तव्य बजावून नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल नयोमी यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सिंधुदुर्गकरांना तुझा सार्थ अभिमान आहे. असे सांगत पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.

