मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या उत्पादन, वितरण आणि विकासाला गती मिळणार
मुंबई : मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या उत्पादन, वितरण आणि विकासाला गती मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागात प्रथमच AI Technology चा वापर करण्यात येणार आहे.

याअंतर्गत Smart Fish stock Assessment system (SFSS) विकसित करण्यात येत आहे. या संदर्भातला करारनामा (MOU) आज दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी मंत्रालय येथे करण्यात आला. AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे मत्स्य व्यवसाय हे राज्यातील पहिले मंत्रालय असणार आहे. Al Technology चा वापर करून जलाशय विकसित करणे, मत्स्योत्पादनाची आकडेवारी, तसेच माहितीचे संकलन करून त्याचा वापर वितरण आणि विपणन कामांसाठी करण्यात येणार आहे.
यावेळी मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री डॉ.एन. रामास्वामी, सचिव (पदुम), श्री. किशोर तावडे, आयुक्त मत्स्यव्यवसाय, साई कृष्णा, मार्वल संचालक व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

