Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ तालुक्यातील सरपंचपदासाठी १५ जुलै रोजी फेर सोडत

कुडाळ तालुक्यातील सरपंचपदासाठी १५ जुलै रोजी फेर सोडत

सहभागी होण्याचे तहसीलदार यांचे आवाहन

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार ही नवीन आरक्षण सोडत आता १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधी आणि नागरीक यांनी या सोडत कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन कुडाळते तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.
ग्रामविकास विभागाने 13 जून रोजी प्रसिद्धीस केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे मागील सर्व अधिसूचना रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. कुडाळ तालूक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंचांची पदे ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-व दिनांक १३ जून २०२५ अन्वये सन 2025 ते 2030 या कालावधीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन आरक्षण निश्चित केली असून त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करणेत आले आहे. कुडाळ तालूक्यातील सरपंचपदे जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांजकडील दि.७ जुलै २०२५ च्या पत्रान्वये आरक्षित करुन देणेत आलेली आहे.
ती आरक्षणे खालीलप्रमाणे आहेत , अनुसूचित जातीसाठीआरक्षित सरपंचाची पदे - प्रवर्ग - २ / महिला - ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे - प्रवर्ग - १ / महिला - ०, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे - प्रवर्ग - ९ / महिला - ९, खुला प्रवर्ग - प्रवर्ग - २२ / महिला - २२
ही नवीन आरक्षण सोडत आता १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधी आणि नागरीक यांनी या सोडत कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन कुडाळते तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.

rapan bottom