Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भगवंतगड-आचरा एसटी बस फेरी व्हाया लब्देवाडी मार्गे सुरू

भगवंतगड-आचरा एसटी बस फेरी व्हाया लब्देवाडी मार्गे सुरू

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांची मागणी पुर्ण

जुबेर खान | मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे चिंदर गावातील विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची भगवंतगड-आचरा एसटी बस फेरी व्हाया लब्देवाडी मार्गे सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आज, ७ जुलै २०२५ रोजी पूर्ण झाली आहे. सकाळी सात वाजता माऊली मंदिरातून सुटणारी ही बस सेवा सुरू झाल्याने आचरा हायस्कूलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांसाठीही ती उपयुक्त ठरणार आहे.

गेल्या काही काळापासून चिंदर आणि लब्देवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत होती. तसेच, ग्रामस्थांनाही आचरा येथे जाण्यासाठी योग्य वेळेवर बस उपलब्ध नव्हती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदन दिले होते. १७ जून २०२५ रोजी आमदार राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक, राप कणकवली यांना पत्र पाठवून या मागणीकडे लक्ष वेधले होते. सोबत चिंदर ग्रामपंचायतीचे निवेदनही जोडले होते.

आमदार राणे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की, भगवंतगड-आचरा ही एसटी फेरी व्हाया लब्देवाडी मार्गाने सुरू करावी आणि सकाळी सात वाजता माऊली मंदिरापासून ती सुरू केल्यास विद्यार्थ्यांना शाळेसाठी तसेच ग्रामस्थांना मोठा फायदा होईल. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे आज अखेर ही मागणी पूर्णत्वास गेली आहे.

आज सकाळी ७ वाजल्यापासून ही बस सेवा प्रत्यक्ष सुरू झाली असून, चिंदर आणि लब्देवाडी परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांनी आणि संतोष कोदे यांच्यासह शिवसेना चिंदर विभागातील कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांचे याबद्दल आभार मानले आहे. आमदार राणे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि लोकहिताच्या दृष्टिकोनामुळे चिंदरवासीयांची एक महत्त्वाची समस्या मार्गी लागली आहे. या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना नियमित शाळेत जाणे सोपे होईल, तसेच ग्रामस्थांनाही त्यांच्या दैनंदिन कामांसाठी वेळेवर पोहोचता येणार आहे. याबाबत माहिती मनोज हडकर यांनी दिली आहे.

rapan bottom