Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

संमेश परब यांची तत्परता, वीज अधिकाऱ्यांची साथ

संमेश परब यांची तत्परता, वीज अधिकाऱ्यांची साथ

कोसळलेला वीज खांब नव्याने उभारून वीज पुरवठा केला पुर्वपदावर

मालवण : मालवण शहरातील हिंदळेकर वाड्यात वादळी वाऱ्यामुळे एक नारळाचे झाड विद्युत तारांवर कोसळले, ज्यामुळे विद्युत खांब मोडून पडला. यामुळे परिसरातील सुमारे १०० घरांचा विद्युत पुरवठा ठप्प झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख संमेश उर्फ राजू परब यांच्याशी संपर्क साधला. परब यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही वेळ न घालवता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केल्यानंतर लगेचच मालवण महावितरणचे अधिकारी मयेकर यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. मयेकर यांनी देखील परिस्थितीचे भान ठेवत, विलंब न लावता आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या तत्परतेने काम करत, कोसळलेला विद्युत खांब बाजूला करून अवघ्या काही वेळात नवीन विद्युत खांब उभारला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे परिसरातील विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. या तात्काळ मदतीमुळे हिंदळेकर वाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या संपूर्ण घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख संमेश परब यांनी दाखवलेली तत्परता आणि नागरिकांना केलेली मदत अत्यंत कौतुकास्पद ठरली. नागरिकांनी परब यांचे आभार मानले, तर परब आणि स्थानिक नागरिकांनी देखील महावितरणचे अधिकारी मयेकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोठी समस्या अल्पावधीतच दूर झाली आणि हिंदळेकर वाड्यातील जनजीवन पूर्वपदावर आले.

या विधुत खांबाच्या उभारणीच्या मदत कार्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहरप्रमुख संमेश उर्फ राजू परब, बाबू झाड, प्रभात हिंदळेकर, संदीप पेडणेकर, गणेश पेडणेकर, अमित हिंदळेकर, संतोष हिंदळेकर, पपली हिंदळेकर, शैलेश मयेकर, उलास मुणगेकर आदी हिंदळेकरवाड्यातील नागरिक उपस्थित होते.

rapan bottom