Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ कोर्टाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

कुडाळ कोर्टाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघटनेचे सहकार्य

अंमली पदार्थ दुष्परिणाम आणि पोस्को कायद्याविषयी मार्गर्दर्शन

निलेश जोशी | कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूल जुनिअर कॉलेज कुडाळ येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून एका शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेजचे सह प्राचार्य श्री साळवी सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात वकील राजीव बिले यांनी अमली पदार्थांचे सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वकील संजय रानडे यांनी POCSO Act या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीमती नाखरे मॅडम यांनी केले. कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेज कुडाळचे प्राध्यापक अजित व्हनमानेयांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला 85 ते 90 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक आर टी आरेकर व चपराशी श्री कडव यांनी केली.

rapan bottom