Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

विठ्ठल नामाची 'शाळा' भरली…

विठ्ठल नामाची 'शाळा' भरली…

मालवण भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा व बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी साकारला 'वारी' सोहळा

जुबेर खान | मालवण : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन गेला असताना मालवण तालुक्यात अनेक शाळांमध्यें आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. आज मालवणमधील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळा व बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी दिंडी काढली. जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल असा विठुरायाचा जयघोष करत आणि विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषा करीत ही दिंडी काढण्यात आली.

भंडारी प्राथमिक शाळेसह मालवण तालुक्यातील इतर शाळांमध्येही आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुलांनी वारकरी दिंडी काढली. भंडारी प्राथमिक शाळेत काढलेल्या वारकरी दिंडी मध्ये विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा करत, कपाळावर टिळा लावत, डोईवर तुलसी वृंदावन घेऊन, भगव्या पताका फडकवत आणि टाळ चिपळीच्या ससंगे विठू नामाचा गजर करत लहान मुले सहभागी झाली होती. मुलांनी साकारलेल्या या वेशभूषा सर्वांचेच आकर्षण ठरल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी ही वारकरी दिंडी काढली.

यावेळी भंडारी ए सो प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, शिक्षिका सौ. राधा दिघे, श्रीमती स्वाती दळवी, सौ. पूर्वी गोवेकर, श्रीमती मानसी परुळेकर, सौ. तृप्ती वालावलकर, सौ. योगिता तारी आदी उपस्थित होते.

rapan bottom