Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधूदुर्ग कॉलेज अर्थशास्त्र विभागात जिल्ह्यात अव्वल

सिंधूदुर्ग कॉलेज अर्थशास्त्र विभागात जिल्ह्यात अव्वल

अर्थशास्त्र विभागाची चैताली कुणवळेकर जिल्ह्यात पहिली आणि लक्ष्मी पारकर दुसरी

मालवण : स. का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण कॉलेजमध्ये तृतीय वर्षी अर्थशास्त्र विषयातमध्ये टी. वाय. बी. ए या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चैताली कुणकवळेकर आणि लक्ष्मी पारकर या दोघींनी टी. वाय. बी. ए मध्ये अर्थशास्त्राच्या विषयामध्ये (सिक्स इकॉनॉमिक्स) पहिला आणि दुसरा क्रमांक पटवलेला आहे. चैताली कुणकवळेकर ९.५८ ग्रेड घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली. त्याचबरोबर लक्ष्मी पारकर ही ९.४३ग्रेड घेऊन जिल्ह्यात दुसरी आली आहे. त्याचबरोबर कॉलेजच्या अर्थशास्त्रविभागाचा (इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट )चा निकाल ही शंभर टक्के लागलेला आहे.

चैताली कुणकवळेकर आणि लक्ष्मी पारकर या स्पेशल इकॉनॉमिक्स (Six Economics )तृतीय वर्ष शाखेमध्ये शिकत होत्या त्यांना अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ.डी.व्ही हरगिले, प्राध्यापक डॉ मल्लेश खोत, प्राध्यापक प्रमोद खरात यांचे मार्गदर्शन लाभले. अर्थशास्त्र हा विषय जगभरात चालणारा विषय आहे. जगाची आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही अनेक अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार चालत असते अशा विषयात प्राविण्य मिळवणे कठीण असते तरीसुद्धा सिंधुदुर्ग कॉलेजच्या या विद्यार्थिनींनी 9.58 इतक्या ग्रेड मिळवून जिल्ह्यात आणि युनिव्हर्सिटी मध्ये अव्वल स्थान निर्माण केलेले आहे त्याबद्दल प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ देविदास हरगिले, प्राध्यापक डॉ मल्लेश खोत प्राध्यापक प्रमोद खरात उपस्थित होते. त्याचबरोबर खोबरे सर, तावडे सर, मीनल सावंत मॅडम, विभा मॅडम, ऑफिस स्टाफ उपस्थित होता.
कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर साहेब कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुषे , शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ यामध्ये , संदेश कोयंडे , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर , भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी हर्षदाचे अभिनंदन केले .तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक, ऑफिस स्टाफ लायब्ररी स्टाफ मालवण मधील पदाधिकारी आणि पत्रकार संघटना यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. अर्थशास्त्र अभिषेक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या विषयांमध्ये पदवी घेऊन अनेक नोकरीच्या व करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पी चिदंबरम अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाननी अर्थशास्त्रात पदवी घेऊन आपले करिअर केलेले आहे त्यामुळे हा विषय देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा विषय आहे व त्यासाठी या विषयांमध्ये मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पदवी घेऊन वेगवेगळ्या करिअरच्या संधी प्राप्त कराव्यात आणि आपल्या जीवनामध्ये स्थिरस्थावर व्हावे असा संदेश अर्थशास्त्र प्राध्यापक डॉ. मल्लेश खोत सर यांच्याकडून मालवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

rapan bottom