Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

राणे साहेबांचा वारसा आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे त्याच शैलीत पुढे नेत आहेत !

राणे साहेबांचा वारसा आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे त्याच शैलीत पुढे नेत आहेत !

जनतेला अभिमान वाटावे असे कार्य

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

अमित खोत | मालवण : सिंधुदुर्गच्या विकासाची मुहूर्तमेढ राणे साहेबानी रोवली. आपल्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीने तसेच कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठसा उमटवला. विधानसभेतील त्यांच्या भाषणांचे संदर्भ विरोधकही घेतात. राणे साहेबांचा तोच वारसा आज आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे त्याच शैलीत समर्थ पणे पुढे नेत आहेत. गेल्या दहा वर्षात दुर्लक्षित असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघाला आमदार निलेश राणे यांच्या रूपाने संजीवनी मिळाली. विकासाला गती मिळाली. जनतेचा आवाज विधिमंडळात घुमला. जनतेला अभिमान वाटावा असे कार्य आमदार निलेश राणे अभ्यासपूर्ण कार्यातून महाराष्ट्र अनुभवतोय. अश्या भावना शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केल्या आहेत.

राणे साहेबांची जनतेप्रती जशी आत्मीयता आहे. आपुलकी आहे, तीच भावना आमदार निलेश राणे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कृतीतून दिसून येते. जनतेचे प्रश्न प्राधान्याने सुटले पाहिजेत. यासाठी त्यांची असलेली तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून येते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न, वीज प्रश्न हे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जाणून ते अभ्यासपूर्ण भाषणातून सभागृहात मांडणाऱ्या आमदार निलेश राणे यांचा मालवण कुडाळच्या जनतेला सार्थ अभिमान निश्चितच वाटला. मागील दहा वर्षात हा मतदारसंघ विकासात मागे होता, विधिमंडळात आवाज नव्हता. मात्र आता हक्काचे नेतृत्व मालवण कुडाळला लाभले.

खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनात, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ विकासात अग्रेसर बनेल. सोबतच पालकमंत्री यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभा सोबत सिंधुदुर्ग जिल्हा विकासाची गरुडझेप घेईल हे निश्चित. अश्या भावना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केल्या आहेत.

rapan bottom