Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कर्तृत्ववान महिला नेतृत्व सौ. शिल्पा यतीन खोत

कर्तृत्ववान महिला नेतृत्व सौ. शिल्पा यतीन खोत

समाजसेवेचा वसा हाती घेत सर्वासामान्यांच्या न्याय हक्कासाठी, सन्मानासाठी अविरत सेवाकार्य करणाऱ्या अनेक समाजसेवकांचा वारसा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला आहे. आजही अनेक क्षेत्रात तन, मन आणि धन अर्पून सेवाकार्य करणारे अनेक हात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक पटलावर कार्यरत राहून सर्वासामान्य जनता, स्त्री शक्तीसाठी सतत कार्यरत असणारे एक आदर्श महिला व्यक्तिमत्त्व… मालवणच्या सौ. शिल्पा यतीन खोत या होय…

कोणताही सामाजिक प्रश्न, समस्या असूदेत शिल्पा खोत या त्याठिकाणी पोहचणार आपल्या परीने जे शक्य आहे ते 100 टक्के देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला. अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्यांनी न्याय मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भुमिका राहिली. त्यांनी फायद्या तोट्याचे गणित कधी मांडलेच नाही. त्यांची भुमिका नेहमीच ठाम आणि प्रामाणिक राहिली. खऱ्या अर्थाने लोकसवेक म्हणून त्यांचे सुरु असलेले कार्य निस्वार्थी आणि आदर्शवत असेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही सर्व सेवक आहोत. असे सांगणाऱ्या शिल्पा खोत यांच्या कार्यातून कट्टर शिवभक्ती सातत्याने दिसून येते. अश्या या सामाजिक पटलावरील कर्तृत्ववान स्त्री शक्तीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

शिल्पा यांचे माहेर सावंतवाडी तालुक्यात. वडील एसआरपी सेवेत. सिंधुदुर्गच्या स्थापनेनंतर जिल्हा पोलिस दलात रुजू झाले. मात्र विविध तालुक्यात ते सेवा बजवताना कुटुंबाचा प्रवासही फिरता राहिला. मात्र मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले.

हुशार व अभ्यासू वृत्ती लाभलेल्या शिल्पा यांना उच्च शिक्षणाच्या ध्यास होता. शिल्पा यांचे पदवी शिक्षण सावंतवाडीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी एमए व डीएड शिक्षणासाठी शासकीय प्रवेशासाठी प्रयत्न केले. डीएड साठीही प्रवेश मिळाला मात्र शिल्पा या एमए शिक्षणासाठी पुणे एसएनडीटी येथे दाखल झाल्या. एमए शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी एयर हॉस्टेस अकॅडमी दादर याठिकाणी एव्हीयेशन एयरलाईन व हॉस्पिटॅलिटी डिप्लोमा पूर्ण केला. मुंबईतील ओबेरॉय, आयटीसी या पंचतारांकित हॉटेल मध्येही शिक्षणाशी संलग्न सेवकाळ पूर्ण केला. दरम्यानच्या काळात मुंबई व सावंतवाडी याठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांनी एक आवड म्हणून शिक्षकी सेवाही बजावली. कॉम्पुटर व अन्य काही कोर्सही यादरम्यान पूर्ण केले.

शिल्पा यांना किंगफिशर एयर लाईन्स मधून कॉल आला. त्याठिकाणी त्या जॉईन झाल्या. अडीज वर्षे त्यांनी त्याठिकाणी सेवा दिली. एव्हीयेशन एअरलाईन सेवेत अत्यंत महत्वाचा व परीक्षा स्तरावर अवघड असा AVSEC कोर्सही शिल्पा उत्तीर्ण झाल्या. त्या नंतर गोवा विमानतळावर एअर इंडियात सेवेचा कॉल व जॉइनिंग लेटरही त्यांना मिळाले. मात्र त्याच दरम्यान मालवण येथील यतीन परशुराम खोत यांचे लग्नस्थळ त्यांना आले. एअर इंडियातील करियर संधी बाजूला ठेवून शिल्पा या सौ. शिल्पा यतीन खोत झाल्या.

राजकीय, सामाजिक व व्यावसायिक अशी मोठी पार्श्वभूमी असलेल्या खोत कुटुंबात शिल्पा यांचा प्रवेश झाला. एक सामाजिक कार्यकर्ता ते कार्यसम्राट नगरसेवक, बांधकाम सभापती अशी ओळख लाभलेल्या पती यतीन खोत यांची खंबीर साथ व भक्कम पाठिंबा नेहमीच आपल्याला मिळाल्याचे शिल्पा सांगतात. त्यांच्याच सामाजिक कार्याने प्रेरित होऊन शिल्पा यांच्याही समाजसेवेचा प्रवास सुरु झाला आणि अखंड सुरू आहे.

माहेर व सासर सर्वच मंडळींनी सामाजिक कार्यात प्रोत्साहन दिले. त्यामुळेच अधिक गतिमान पद्धतीने समाजकार्य करणे सोपे झाल्याचे शिल्पा सांगतात. पती यतीन यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू असते. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने आपण काम करत आहोत. आपल्याला कोणी मोठे म्हणावे म्हणून समाजकार्य करायचे नाही. तर या समाजाचे आपण देणे लागतो. समाजसेवा हे आपले कर्तव्य आहे याच भावनेतून आपण काम करतो. असे त्या सांगतात. यातूनच त्यांची निरपेक्ष वृत्ती स्पष्ट होते.

महिला, मुलींना व्यासपीठ मिळवून देणे. त्यांच्या समस्या सोडवणे. त्यांना संघटित करून, विविध उपक्रम राबवणे. महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणे. त्यांना न्याय मिळवून देणे. गोरगरीब जनतेसाठी, आजारी व्यक्तींसाठी मदतीचा हात घेऊन शिल्पा या तन, मन, धन यासह नेहमीच सेवेत असतात. त्यासोबत प्राणी प्रेमी, पक्षी प्रेमी भावनेतूनही त्यांचे काम सुरू आहे.

महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा. हा मालवणातील किंबहुना जिल्ह्यातील पहिला स्त्री शक्ती सहभागाचा उपक्रम नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिल्पा यांनी यशस्वीपणे राबवला. त्यात सातत्यही राखले. ही स्पर्धा सिंधुदुर्गची ओळख बनली.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी गरबा, दांडिया व विविध स्पर्धा उपक्रम. त्यात महिलांचा असणारा उत्स्फुर्त सहभाग. उल्लेखनीय राहिला.

जिल्ह्यातील पाहिले महिला ढोल ताशा पथक. शिल्पा यांनी स्वराज्य या बॅनर खाली स्थापन केले. आसमंत दणाणून सोडणाऱ्या या ढोल पथकाने नेत्रदीपक सादरीकरणाने जिल्ह्यात तसेच जिल्ह्या बाहेरही नावलौकिक मिळवला.

रक्तदान हेच सर्वस्रेष्ठ दान. या उदात्त भावनेतून या क्षेत्रातही सेवाभावी वृत्तीने काम करत मोलाची भूमिका शिल्पा या बजावतात. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज आहे. त्याची गरज पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या माध्यमातून असुदेत नाहीतर इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असो. रुग्ण सेवेसाठी शिल्पा यांची असलेली तळमळ त्यांच्यातील माणुसकी व सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवते. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण अध्यक्ष पदीही शिल्पा कार्यरत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्य कर्तृत्ववाबाबत प्रचंड आदर शिल्पा यांच्यात आहे. त्यातूनच गड किल्ले याबाबत त्यांचे असणारे प्रेम. तेथील स्वच्छता व अन्य सामाजिक कार्यात शिल्पा यांचा सहभाग सातत्याने असतो.

शिल्पा यांच्या सामाजिक कार्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली आहे. विविध पुरस्कार व विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. शासकीय स्तरावर, विविध संघटना यांनीही शिल्पा यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे.

विविध सामाजिक संस्थांमध्ये त्या पदाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. सामाजिक कार्य करत असताना शिल्पा यांच्यातील निसर्ग प्रेमी भावना नेहमीच व्यक्त होतात. झाडे आहेत तर जीवन आहे. निसर्ग टिकला पाहिजे, पर्यावरणाची हानी होता नये. समुद्र किनारे स्वच्छ राहिले पाहिजेत. पाणी प्रदूषण होता नये. सोबतच आपला प्रत्येक ऐतिहासिक ठेवा जतन व समृद्ध राहिला पाहिजे. या भावनेतूनही शिल्पा यांचा सेवा देण्याचा प्रयत्न कायम असतो.

आरोग्य सेवा क्षेत्रातही शिल्पा या आपल्या परीने सेवेसाठी तत्पर असतात. कोरोना काळातही शिल्पा खोत यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य व सेवेते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महिला व संपूर्ण टीमने जनसेवेची मोठी जबाबदारी पार पाडली. गरजुना धान्य वाटप, काहींना थेट मदत, काहींना घरपोच सुविधा त्या बरोबर आरोग्य सेवा, आरोग्य तपासणीही करण्यात आल्या. आरोग्य सेवेतही अखंडितपणे काम सुरू आहे. एकूणच सेवा कार्यातील उत्कृष्ट नियोजन व तत्पर सेवेबाबत शिल्पा खोत व त्यांच्या टीमचे तहसीलदार, मुख्याधिकारी, डॉक्टर यांनीही विशेष कौतुक केले.

सण उत्सव कार्यक्रम निमित्ताने रॅली, महोत्सव यासह अन्य मोठे कार्यक्रम यांच्या यशस्वीततेतही शिल्पा व यतीन यांचा सहभाग व पुढाकार नेहमीच असतो. शिल्पा व यतीन यांचा सहभाग म्हणजे कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन हे समीकरणच बनले आहे.

या सोबतच गोरगरीब जनता व निराधार यांना मदतीचा हात देणे त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य भावनेतून मदत करणे. याबाबत पती यतीन यांच्या सोबतीने शिल्पा यांचे सेवाकार्य सुरूच असते. अनेकवेळा तर या हाताने दिलेली मदत त्या हातानाही माहिती नसते. वैयक्तिक जीवनातील अनेक आनंदाचे क्षण गोरगरीब जनता व निराधार यांच्या सोबत घालवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवण्याचे लाखमोलाचे कार्य खोत दाम्पत्य नेहमीच करतात. मुलांचा वाढदिवस याच सर्वांसोबत साजरा होतो. खोत दाम्पत्याचे कार्य आदर्शवत असेच आहे.

एकूणच यतीन व शिल्पा यांच्या सामाजिक उपक्रम व समाजकार्याची यादी न संपणारी व वाढती अशीच आहे. त्यांच्या हातून होत असलेली जनसेवा अशीच अखंडपणे घडत राहो. शिवप्रेम, निसर्ग प्रेम, प्राणी प्रेम यासोबत सर्वसामान्य जनता व स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी सतत सेवकार्यात असणाऱ्या सौ. शिल्पा यतीन खोत यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो….. वाढदिवस अभिष्टचिंतन….

✒️ अमित खोत, मालवण

rapan bottom