Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने पेट्रोल ओतून घेतले जाळून

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने पेट्रोल ओतून घेतले जाळून

मुलीच्या वडिलांची कुडाळ पोलिसात तक्रार

मुलीची प्रकृती चिंताजनक

निलेश जोशी | कुडाळ : कणकवली तालुक्यातील नाटळ खांदरवाडी येथील नवविवाहिता अंकिता रणबीर कदम (वय  30)  हिने आपले आई-वडील राहत असलेल्या कुडाळ  तालुक्यातील नेरुर-रावलेवाडी येथील घरी २ जुलै रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ग्रासकटरसाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आग लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  त्यात ती गंभीररीत्या भाजली असून तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरस येथे दाखल करण्यात आले आहे. 
    जखमी अंकिताचे वडील सुभाष झिलू नेमण (मूळ रा मातोंड-गोवळवाडी सध्या रा नेरुर रावलेवाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अंकिताचा पती रणबीर प्रकाश कदम (वय 35, रा खांदरवाडी नाटळ) सासरे प्रकाश गणपत कदम (वय 70)  व सासू (नाव माहित नाही) या तिघांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात बीएनएस 85/108/62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काल बुधवारीच अंकिताचे सासरे प्रकाश कदम यांनी अंकिताला रिक्षाने आणून माहेरी सोडले.  ही काही काम करत नाही, हिला माहेरीच ठेवून घ्या, असे सांगून ते निघून गेले आणि रात्री अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केला.  सासरी अंकिताचा छळ होत होता.  त्यामुळे त्यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.  अधिक तपास एपीआय वैशाली आडकुर करीत आहेत.

rapan bottom