Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सा.बां. विभागाची महावितरण ठेकेदाराविरोधात पोलिसात तक्रार

सा.बां. विभागाची महावितरण ठेकेदाराविरोधात पोलिसात तक्रार

भूमिगत वीज वाहिन्या घालताना ३० लाखाचे केले नुकसान

निलेश जोशी | कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मठ-कुडाळ या रस्त्यावर भूमिगत वीज वाहिन्या टाकताना परवानगी न घेता जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदाई केली. तसेच साईडपट्ट्या योग्य पद्धतीने न बुजविता सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमारे ३० लाख रुयांचे नुकसान केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळचे कनिष्ठ अभियंता ईश्वर रामचंद्र बामणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी महावितरणचे ठेकेदार भीमराव घोटाळे यांच्या विरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 1984 (3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे तसेच ठेकेदाराचे दोन जेसीबी आणि अन्य मशिनरी जप्त करून कुडाळ पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत
विद्युत वितरण कंपनीचे भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. सध्या मठ-कुडाळ-पणदूर-हुमरमळा-जांभवडे-गारगोटी या राज्यमार्ग क्र 179 वर मठ ते कुडाळ या मार्गावर काम सुरू आहे. मे अखेर पासून काम सुरू करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागांची कोणतीही परवानगी न घेता कुडाळ ते मठ वेंगुर्ला या लाईनसाठी खोदाई करण्यात येत आहे. वाडीवरवडे येथे काम सुरू असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या खोदाईबाबत परवानग्या न घेता काम करण्यात येत आहे. तसेच साईड पट्टी बुजविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या. मात्र साईडपट्टी न बुजवता तशीच ठेवून शासनाच्या सुमारे 30 लाख रुपये मालमत्तेचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रस्त्यालगत खोदाई करून साईडपट्टी बुजविण्यात आली नसल्याने, वाहने आत फसूनन अपघात होण्याची भीती आहे. दरम्यान ठेकेदारांच्या मशिनरी जप्त करून कुडाळ पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत.

rapan bottom