Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

रेकोबा हायस्कूलच्या ४६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रेकोबा हायस्कूलच्या ४६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ

वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे…

मालवण : माजी विद्यार्थी शाळेला विविध रूपात मदत करतात .शाळेची आठवण काढतात हे अभिमानास्पद आहे. माजी विद्यार्थी हा प्रशालेचा आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन रेकोबा हायस्कूलच्या 46 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वायरी ग्रामपंचायत सरपंच, शालेय समिती सदस्य भगवान लुडबे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण कुबल यांनी केले .गेल्या 46 वर्षात केलेले कार्य, माजी विद्यार्थी करत असलेली मदत, विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती याविषयीचा आढावा घेतला. मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी मुलाने सातत्याने प्रयत्न करून कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी एच.डी. गावकर साहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर श्रेया करंगुटकर व वेद कुबल या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात मिताली मोंडकर यांनी शाळेचा इतिहास सांगितला. मुलांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या दृष्टीने विविध देणगीदाराने दिलेल्या शिष्यवृत्तीचे वाटप तसेच सन 2016/ 17 च्या दहावीच्या बॅच कडून दिले गेलेले शैक्षणिक साहित्य यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर डगरे तर आभार श्रीनाथ फणसेकर यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विरेश नाईक, माजी मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर, पालक व पत्रकार संदीप बोडवे, शुभदा शिंदोळकर, संभाजी कोरे ,रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, प्रतीक्षा परकर ,श्रेया बोडवे, दत्तात्रय गोसावी ,यशवंत गावकर तसेच माजी विद्यार्थी ऋतिक चव्हाण ,भावना करलकर ,सिद्धेश कवटकर ,आकांक्षा लुडबे, रामचंद्र डोईफोडे ,विनय नेसवणकर, निखिल चव्हाण, तुकाराम हारकर ,अंकिता परुळेकर, भावना सरमळकर, रिया गावकर, साक्षी कवटकर, आयुष मांजरेकर, साहिल बागवे आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

rapan bottom