Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

Malvan | लायन्स क्लबतर्फे डॉक्टर्स, कृषी अधिकारी व सीए यांचा सन्मान

Malvan | लायन्स क्लबतर्फे डॉक्टर्स, कृषी अधिकारी व सीए यांचा सन्मान

विविध ठिकाणी वृक्षलागवड

नूतन अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील नूतन कार्यकारिणीने सामाजिक उपक्रमांचा केला शुभारंभ

मालवण : लायन्स क्लब मालवणची सन २०२५- २६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे. नूतन अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणीने सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. १ जुलै यादिवशी असलेल्या डॉक्टर्स डे, कृषी दिन, व चार्टर्ड अकाऊंटंट डे यांचे औचित्य साधून मालवण मधील डॉक्टर, कृषी अधिकारी व चार्टर्ड अकाऊंटंट यांचा लायन्स क्लब तर्फे कल्पवृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.

डॉक्टर डे निमित्ताने डॉ. दर्शन खानोलकर (रेडकर हॉस्पिटल), डॉ. यज्ञा तारी (रेडकर हॉस्पिटल), डॉ. संजय पाटील (दंतचिकित्सक), डॉ. पंकज दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. सचिन दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. अश्विन दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. जुई देसाई (दंतचिकित्सक), डॉ. शशिकांत झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. मालविका झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. अमोल झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. विणा मेहेंदळे (मसुरे), डॉ. हरिश परुळेकर (बालरोगतज्ञ), डॉ. राजन लांडगे (पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ. रजत दळवी (पशुवैद्यकीय अधिकारी) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कृषी दिनानिमित्त श्री. दत्तात्रय मस्कर (कृषी अधिकारी), सौ. संजीवनी वाघमारे (कृषी अधिकारी) यांचा तसेच चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) दिनानिमित्त सीए युगांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी दिन निमित्ताने मालवणमधील श्री माघी गणेश मंदिर परिसर, नागेश्वर संकुल, बांगीवाडा येथे कल्पवृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी लायन्स क्लब मालवणच्या नूतन अध्यक्ष सौ. अनुष्का चव्हाण, सचिव सौ. मनाली दळवी, खजिनदार सौ. पूनम चव्हाण यांच्यासह मावळते अध्यक्ष महेश अंधारी, लायन्स सदस्य गणेश प्रभुलीकर, विश्वास गावकर, राजा शंकरदास, मुकेश बावकर, शांती पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शालबिद्रे, सहदेव बापार्डेकर, अरविंद ओटवणेकर, रुजारिओ पिंटो, महेश कारेकर, जयश्री हडकर, स्वप्नाली नेरुळकर, गीता आचरेकर, नंदिनी गावकर, दीक्षा गावकर, राधिका मोडकर, सारिका मोडकर, पल्लवी तारी, ऋग्वेदा धामापूरकर यांसह अन्य उपस्थित होते.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom