भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवडीचा आनंदोत्सव
मालवण | प्रतिनिधी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मालवणचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निवडीनंतर आडवली मालडी विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यां कडून किर्लोस गोठणे ब्रिज जवळ जल्लोष करत फटाके फोडून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपा पदाधिकारी जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, भाजपा जेष्ठ नेते बाळा लाड, शक्तीकेंद्र प्रमुख राजेश तांबे, प्रविण घडिगांवकर, भाई घाडीगांवकर, माजी उपसभापती अरूण मेस्त्री, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, माजी सरपंच अरूण परब, उपसरपंच बाळा परब, प्रभारी दया हाटले, खरेदी विक्री संघ संचालक अभय प्रभुदेसाई, ॲड. लक्ष्मण बाक्रे, माजी उपसरपंच संतोष धुरी, बुथ अध्यक्ष संतोष धुरी, नरेश कामतेकर, सतीश नलावडे, राजू जगताप, बाळा घाडीगांवकर, दिपक तांबे, सखाराम किर्लोस्कर, विलास किर्लोस्कर, बाबू कदम, उदय तांबे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत माहिती महेंद्र चव्हाण यांनी दिली.

