Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

Agriculture Day| शेतीतून प्रगती साधा : गटविकास अधिकारी शाम चव्हाण

Agriculture Day| शेतीतून प्रगती साधा : गटविकास अधिकारी शाम चव्हाण

ग्रामपंचायत खरारे-पेंडूर येथे कृषिदिन शेतकरी मेळावा संपन्न

महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण : शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक कृषी योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीतून प्रगती साधवी. असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिन शेतकरी मेळावा ग्रामपंचायत खरारे-पेंडूर सभागृह येथे संपन्न झाला. या मेळाव्याच्या पूर्वी न्यू इंग्लिश स्कुल पेंडूर ते ग्रामपंचायत अशी शालेय मुलांची वृक्ष दिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसमवेत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण व इतर प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पालक, शेतकरी सहभागी झाले होते. पेंडूर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात श्याम चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

खरारे पेंडूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, पंचायत समिती अधिकारी व्ही. के. जाधव, मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार वेर्लेकर, सरपंच सौ. नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, प्रगतशील आंबा व्यावसायिक डॉ. उत्तम फोंडेकर, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विकास धामापूरकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, कृषी विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, विस्तार अधिकारी आत्माराम परब, विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र रणसिंग, पेंडूर सहाय्यक कृषी अधिकारी व्ही. आर. कुबल, ग्राम पंचायत अधिकारी शुभदा कोठावळे, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, आचरा मंडळ कृषी अधिकारी हुसेन आंब्रडकर, प्रभारी कृषी मंडळ अधिकारी दशरथ सावंत, ग्रा. पं. सदस्य सौ. समृद्धी सरमळकर, अंकिता सावंत, अश्विनी पेडणेकर, पं. स. डीईओ यु. टी. खोबरेकर, सतीश कांबळी, संतोष राऊळ यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी लाड यांनी केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शेतीमध्ये उत्तम व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना दूध किटलीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. उत्तम फोंडेकर यांनी शेती मध्ये नवीन प्रयोग करण्यासासाठी शेतकऱ्यांनी इच्छाशक्ती ठेवावी व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे सांगितले. तर शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांनी शेतीतील रासायनिक खतांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक नैसर्गिक व सेंद्रिय शेती करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. तर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी तालुक्यातील कृषी कार्यक्रमांकडे आमदार निलेश राणे यांचेही विशेष लक्ष असल्याचे सांगितले. डॉ. वेर्लेकर यांनी शासकीय योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी धंनजय गावडे, अजिंक्य पाताडे, नेहा परब यांनीही विचार मांडले.

प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान

प्रगतशील शेतकरी दीपक गावडे, शशी पाटकर, स्वप्नील मेस्त्री, संदेश नाईक, मोहनिश प्रभू, रमेश वराडकर, सुभाष सावंत, आनंद पेडणेकर, घनश्याम राणे, रामदास नांदोसकर वसंत चव्हाण या प्रगतशील शेतकरी यांचा गटविकास अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पेंडूर सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था व श्री देव वेताळ दुग्ध सहकारी संस्था या दोन्ही संस्था सदस्यांना दूध किटलीचे वितरण करण्यात आले.

विविध व्यक्तीमत्वांचा गौरव

फळबाग लागवड मध्ये अमित कुळकर्णी, प्रदीप सावंत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बारावी परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त सोहम विष्णु लाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री आवास योजना मध्ये सर्वोत्कृष्ट घरकुल उभारणी करत तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त विजय रामचंद्र परब यांचा सन्मान करण्यात आला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत 2024-25 वर्षात सर्वाधिक लागवड करणारे पोईप येथील सहाय्यक कृषी अधिकारी एम. बी. कदम तसेच कृषी तंत्रज्ञान व माहिती प्रसार व प्रसिद्धी मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे धामापूर उप कृषी अधिकारी एस. जी. परब यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom