शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. गाव तिथे शाखा आणि संघटन मजबुतीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या या पहिल्याच बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावा गावात मोठा विकासनिधी येत आहे. विकासाचे व्हिजन असणारे आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन अनेक पक्षप्रवेश होत आहेत. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होत असताना पक्ष प्रवेश सुरूच राहतील. असे दत्ता सामंत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी आचरा, जयप्रकाश परुळेकर, संतोष कोदे, भाऊ हडकर, मनोज हडकर, अभिजित सावंत, प्रशांत परब, शशी नाटेकर, राजश्री कोदे, जानवी घाडी, सानिका चिंदरकर, मंगेश गावकर,दत्ता वराडकर, धंनजय नाटेकर यांसह अन्य पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


