वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १ ते ७ जुलै या राष्ट्रीय वन मोहोत्सव सप्ताह निमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे, संस्थेचे विश्वस्त शरदचंद्र रावराणे, प्र.प्राचार्य डॉ. एन. व्हि. गवळी तसेच वैभववाडी सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल श्रीम.अनिता बोडेकर, नाधवडे वनरक्षक श्रद्धा शिवाजी दांगडे व वनरक्षक अंकित आप्पासो काशीद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुपारी, कडुलिंब आणि आवळा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकूण ८० लाभार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. वनरक्षक श्रद्धा दांगडे यांनी “वृक्षारोपण महत्व, मानवी जीवनात झाडाचे महत्व, हवामान बदल आणि वनांचे संवर्धनाचे महत्व सांगितले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे आणि सकारात्मक पाऊल उचलून पर्यावणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. सत्यजित राजे यांनी केले तर आभार प्रा. एस. एम. करपे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पैठणे यांनी केले.

