Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण नवीन प्रभाग कमिटी स्थापन

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण नवीन प्रभाग कमिटी स्थापन

प्रभाग अध्यक्षपदी गणेश पाडगांवकर, प्रभाग सचिवपदी देवेंद्र चव्हाण

शहर अध्यक्षपदी संजय भिलवडकर, शहर उपाध्यक्षपदी पद्माकर माणगांवकर व शहर सचिवपदी सोहम आडवलकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण मालवण तालुका कार्यकारिणीची सभा नुकतीच चंद्रकांत माणगांवकर यांचे घरी मालवण येथील संत रविदास नगर येथे संपन्न झाली. उपस्थित सर्व पदाधिकारी व सभासदांचे तालुका सचिव यांनी स्वागत केले.

यावेळी नविन प्रभाग कमिटी स्थापन करण्यात आली. मालवण प्रभाग अध्यक्ष म्हणून गणेश पाडगांवकर, मालवण प्रभाग सचिव म्हणून देवेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तर मालवण शहर अध्यक्ष पदी संजय भिलवडकर, शहर उपाध्यक्षपदी पद्माकर माणगांवकर व शहर सचिवपदी सोहम आडवलकर यांची निवड करण्यात आली.

राजर्षी शाहू महाराज जयंती आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व समाजातील निवृत्त अधिकारी, प्रमोशन, व विविध संस्थांवर निवड झाल्याबद्दल समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार ओम साई मंगल कार्यालय (मामा माडये) हॉल कट्टा येथे रविवार 6 जुलै 2025 रोजी साजरा करण्याचे तसेच सभेस प्रमुख वक्ते म्हणून श्री प्रसाद नारायण मसुरकर (इतिहास प्राध्यापक) माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांचे नाव तालुकाअध्यक्ष आणि सुचविले त्यास सर्वांनी मान्यता दिली.

आयत्या वेळी येणाऱ्या विषयात* मालवण शहर अध्यक्ष पदी संजय भिलवडकर यांची व शहर उपाध्यक्षपदी पद्माकर माणगांवकर व शहर सचिवपदी सोहम आडवलकर यांची निवड करण्यात आली.

मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या प्रभाग अध्यक्ष गणेश पाडगांवकर व प्रभाग सचिव देवेंद्र चव्हाण सदस्य व सल्लागार यांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

सदर सभेस सल्लागार सुधाकर माणगांवकर, दिपक भिलवडकर, सदस्य निलेश माणगांवकर, चंद्रकांत माणगांवकर व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. सर्वांचे आभार तालुका सचिव यांनी मानले. याबाबत माहिती गणेश पाडगावकर यांनी दिली आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom