जुबेर खान | मालवण : रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक गाव एक संघ’ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्यापासून (३ जुलै) महापुरुष रेवतळे येथील मैदानावर रंगणार आहे. ही स्पर्धा ६ जुलैपर्यंत चालणार असून, क्रिकेटप्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २५,०००/- रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला १५,०००/- रुपये व आकर्षक चषकदेऊन गौरवण्यात येईल. वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाईल.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सर्व सामने SKY NEWS TODAY या युट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे जे प्रेक्षक मैदानावर उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांनाही घरबसल्या या रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
या स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशिकेसाठी इच्छुकांनी पायस अल्मेडा (९३०७९१५१४१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पावसाळी हंगामात क्रिकेटचा उत्साह द्विगुणित करणारी ही स्पर्धा निश्चितच अविस्मरणीय ठरेल अशी भावना क्रीडा रासिकांकडून व्यक्त होत आहे.
🛑 LIVE | एक गाव एक संघ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५
🏏 रूपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ आयोजन
➖➖➖➖➖➖
🎴 SKY NEWS TODAY

