अमित खोत | मालवण : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी मालवणचे सुपुत्र आमदार रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या नियुक्ती सोहळ्या दरम्यान उपस्थित राहून भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांसह मालवणातील भाजपा पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, भाजपा तालुका सचिव तथा नांदोस उपसरपंच विजय निकम, संतोष गावकर, छोटू साटम, विनोद राऊळ यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


