अमित खोत | मालवण : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच कोळंब गावकर स्टॉप येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख मंगेश चव्हाण, बूथ अध्यक्ष सत्यवान लोके, प्रसाद भोजने, चिन्मय पराडकर, मयूर कदम, गणेश आचरेकर, अरुण ढोलम, उत्तम भोजने, अरविंद जेठे, रघुनाथ मोहिते, भाई ढोलम, सुशांत भोजने, दिगंबर लोके, बाबाला डिचोलकर, सुधाकर लाड यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

