Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

यश मिळविलेले विद्यार्थी म्हणजेकट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची रत्ने - सागर बगाडे

यश मिळविलेले विद्यार्थी म्हणजेकट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची रत्ने - सागर बगाडे

मालवण | प्रतिनिधी : यशाच्या भागीदारीत गुरूच्या स्थानाला तोड नसून विदयार्थी घडविण्यामागे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था या सर्व घटकांची मेहनत आहे दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय,कटटा, वराडकर इंग्लिश मिडिअम स्कूल तसेच डॉ. दादासाहेव वराडकर कला व वाणिज्य महाविदयालय कटटा या तिन्ही विभागातील यश मिळविलेले विदयार्थी म्हणजे रत्ने असून प्रशालेच्या उज्ज्वल परंपरेतील सुवर्णक्षराने लिहीण्याजोगा क्षण आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाशिक्षक श्री. सागर बगाडे यांनी कट्टा येथे बोलताना केले

कट्टा येथील वराडकर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कुल च्या दहावी बारावी आणि महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय (संयुक्त) कट्टा, वराडकर इंग्लिश मिडिअम स्कूल तसेच डॉ. दादासाहेव वराडकर कला व वाणिज्य महाविदयालय कटटा या तिन्ही विभागातील दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कट्टा पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बगाडे हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर मालवणचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, मंडळाचे उपाध्यक्ष श्री आनंद वराडकर सचिव श्री सुनिल नाईक स्कुल. कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, सहसचिव साबाजी गावडे खजिनदार श्री. रविंद्रनाथ पावसकर स्मिता कम्प्युटर च्या संचालिका सौ. श्रध्दा नाईक मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, माजी विदयार्थी जयेंद्र परब, इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी पर्यवेक्षक श्री. महेश भाट आदी वा इतर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे स्वागत केले

कट्टा येथील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

यावेळी गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण यांनी आपण या प्रशालेचे माजी विदयार्थी असून जीवनातील खडतर प्रसंगातून आपला प्रवास झाला असून या साठी योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या प्रेरणेतून आज एका उच्च पदावर पोहचण्याची संधी मिळाली असे सांगून विद्यार्थ्यांनी योग्य दिशा व मेहनतीच्या माध्यमातून यशस्वी व्हावे व आपल्या प्रशालेचे पर्यायाने समाजाचे ऋण फेडण्यास सक्षम व्हावे असे आवाहन केले तर
कार्यकमाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी गुणवंत विदयार्थ्यांचे अभिनंदन करीत प्रशालेतील यश मिळविलेल्या गुणवंत विदयार्थ्यांनी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.

यावेळी इ.१० वी, १२ वी च्या तसेच डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविदयालयाच्या गुणवंत विदयार्थ्यांचा तसेच संस्था स्तरावर असणाऱ्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पेंडूरकर सौ. विणा शिरोडकर, कु. संपदा फोपळे कु. के. व्हि. खानोलकर यांनी केले

rapan bottom