Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आमच्याच सरकार विरोधात उपोषण करावे लागणे हि शरमेची गोष्ट !

आमच्याच सरकार विरोधात उपोषण करावे लागणे हि शरमेची गोष्ट !

आंबेरी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी प्रमंग्रासयो कार्यालयासमोर उपोषण

चार दिवसात रास्ता दुरुस्तीचे प्रमंग्रासयो कायालयाचे लेखी पत्र

रस्ता दुरुस्त झाला नाही तर ग्रामपंचायत राजीनामा देणार

निलेश जोशी | कुडाळ : राज्यात आमचे सरकार आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा अवघ्या काही महिन्यात केलेला आमच्या गावातील रस्त्याची दुरवस्था होते आणि त्याच्या दुरुस्तीबाबत कोणीच दाद घेत नसल्यामुळे आम्हाला आमच्याच सरकार विरोधात उपोषण करावे लागत आहे यासारखी शरमेची गोष्ट नाही ! या संतप्त भावना आहेत मालवण तालुक्क्यातील आंबेरी गावच्या ग्रामस्थांच्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आलेल्या चव्हाटा-आंबेरी मार्गावर (ग्रा. मा. ४०७) मोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. याबाबत प्रमंग्रासयोच्या कुडाळ येथील कार्यालयासमोर ग्रामस्थ आज उपोषणाला बसले होते. अखेर चार दिवसात रस्ता दुरुस्त करून देतो असे लेखी पत्र प्रमंग्रासयोचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी ग्रामस्थांना दिल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. पण या पत्राची अंमलबजावणी झाली नाही तर संपूर्ण गावाच्या निर्णयानुसार ग्राम पंचायत सरपंच आणि सगळे सदस्य राजीनामा देणार असल्याचा इशारा सरपंच मनोज डिचोलकर यांनी दिला.


मालवण तालुक्यातील आंबेरी येथील चव्हाटा ते आंबेरी हा (ग्रा.म. ४०७) मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला. या कामाला अवघे काही महिनेच होत नाहीत तो पर्यंत या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून वाहतूक करताना ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे एसटीच्या गाड्या देखील बंद झाल्या होत्या. त्यासाठी सुद्धा ग्रामस्थाना आंदोलन करावे लागले होते.
या रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कुडाळ कार्यालयाकडे ग्रामस्थ, सरपंच यांनी वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रार केली होती. पण या कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पाऊस अधिक वाढण्याच्या आधी रस्ता दुरुस्त करण्यात यावा असे निवेदन प्रमग्रासयोच्या कार्यालयाला देण्यात आले. त्यानुसार आज हे आंबेरी ग्रामस्थ कार्यलयासमोर उपोषणाला बसेल होते.


आमची भाजपची ग्रामपंचायात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. आमचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. खासदार नारायण राणे आहे. तसेच गेल्या निवडणुकीवेळी गावातून ८५ टक्के मतदान भाजपला केले आहे. तरी देखील आमच्या नशिबी असा रस्ता का ? आमच्या मागण्यांची दखल संबंधित कार्यालयाकडून का घेतली जात नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
दरम्यान प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कुडाळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. येत्या चार दिवसात खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करून देतो असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. त्या पत्राचे वाचन सरपंच मनोज डिचोलकर यांनी केले. त्यांनतर ग्रामस्थानी हे उपोषण स्थगित केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी देखील ग्रामस्थांशी चर्चा केली.
पण जर चार दिवसात रस्त्याचे काम झाले नाही तर त्याच खड्ड्यात बसून उपोषण करू, शिवाय गावातर्फे निर्णय घेऊन सरपंचांसह सर्व ग्राम पंचायत सदस्य राजीनामा देऊ असा इशारा सरपंच मनोज डिचोलकर यांनी दिला आहे.
यावेळी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रवींद्र परब, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वाक्कर, गणेश डिचोलकर, पूर्वा मुसळे, मिलन सामंत, वृंदा केळुसकर, माजी सरपंच केशव नांदोसकर, शंकर खोत, बाळू मुसळे, प्रवीण आंबेरकर, शिवराम आंबेरकर, निलेश मुसळे, जगदीश वाक्कर, प्रवीण वाक्कर,अमित डिचोलकर, समीर मांजरेकर, समीर मुणगेकर, महेंद्र केळुसकर, आनंद आंबेरकर, विशाल परुळेकर, संदीप कुलकर्णी, सतीश वाइरकर, बाबा परब, रवींद्र सामंत, संदेश मांजरेकर उपस्थित होते.

rapan bottom