मालवण | प्रतिनिधी : बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ग्रामिण भागात ज्या शिक्षण महर्षीनी शिक्षण संस्थांची स्थापना केली.त्यात शिक्षण महर्षी स्वर्गीय एच डी गावकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे एच डी गावकर हे जसे शिक्षण प्रेमी होते तसेच ते पर्यावरण प्रेमीही होते म्हणूनच दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांनी निसर्गावर प्रेम करा असा संदेश दिला असे प्रतिपादन श्री रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी येथे बोलताना केले.
मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय एच डी गावकर यांची १०६ वी जयंती प्रशाळेच्या आवारात वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डगरे यांनी एच डी गांवकर यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य आदर्शवत असून, नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे. समाज जडणघडणीसाठी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीनाथ फणसेकर यांनी केले तर आभार प्रवीण कुबल यांनी मानले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शुभदा शिंदोळकर, संभाजी कोरे ,रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर ,यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी तसेच विद्यार्थी ही उपस्थित होते.

