Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

ग्राहक पंचायत महाराष्ट्रची वेंगुर्ला कार्यकारिणी जाहीर

ग्राहक पंचायत महाराष्ट्रची वेंगुर्ला कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी डॉ.आनंद बांदेकर यांची निवड

वैभववाडी | प्रतिनिधी : ग्राहक पंचायत महाराष्ट्रची वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी डॉ.आनंद प्रभाकर बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची सभा नुकतीच वेंगुर्ला - रामघाट येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर, संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी, महिला सहसंघटिका श्रीम.रीमा भोसले, सहसचिव श्रीम.सुगंधा देवरुखकर, कोषाध्यक्ष श्री.संजय पाटील, सल्लागार ॲड. समीर वंजारी हे जिल्हा शाखा पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा संघटक श्री. विष्णुप्रसाद दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन सभेचा हेतू स्पष्ट केला.
उपाध्यक्ष श्री. सीताराम कुडतरकर यांनी ही ग्राहक चळवळ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही चळवळ जनचळवळ व्हावी यासाठी सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच सहसचिव सुगंधा देवरुखकर, महिला सह संघटिका रीमा भोसले, सल्लागार ॲड.समीर वंजारी तसेच माजी अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था, संस्थेची रचना आणि कार्यपद्धती तसेच संस्थेच्या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर करीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन.पाटील यांनी दिली. यावेळी प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. डॉ. सचिन परुळकर, प्रा. डॉ. गोविंद धुरी, श्रीम. अंकिता बांदेकर, श्रीम. मंजुषा आरोलकर, श्री. सुनील रेडकर, श्री. नामदेव सरमळकर, श्री.महेश राऊळ, श्री.महेंद्र घाडी, श्री. विकास वैद्य, श्री.हेमंत गावडे, श्री.संजय पिळणकर, श्री. राजन भोसले, रोहन भोसले व सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री.अमोल केसरकर आदी मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.
वेंगुर्ला तालुक्यातील जुन्या-नव्या उपस्थित प्रतिनिधींमधून नूतन वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात खर्डेकर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी- सुनील नवसू रेडकर,उपाध्यक्ष-प्रा.डॉ.सचिन वासुदेव परुळकर, तालुका संघटक- महेश श्रीधर राऊळ, सहसंघटक- महेंद्र सुरेश घाडी, सहसंघटक महिला श्रीम.मंजुषा महेंद्र आरोलकर, सहसचिव- हेमंत दत्ताराम गावडे, कोषाध्यक्ष- प्रा.डॉ.गोविंद प्रकाश धुरी, प्रसिद्धी प्रमुख- संजय सखाराम पिळणकर, सल्लागार- डॉ.संजीव लिंगवत व सदस्य म्हणून श्रीम.अंकिता आनंद बांदेकर यांची निवड करण्यात आली. ग्राहक चळवळ आणि ग्राहक जागृती ही काळाची गरज आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. माझ्यावर विश्वासाने दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करणार असल्याचे नूतन अध्यक्ष डॉ.आनंद बांदेकर यांनी सांगितले.

rapan bottom