निलेश जोशी | कुडाळ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या वतीने सन 2024-25 साठी घेण्यात आलेल्या फार्मसी पदविका कोर्सचा निकाल जाहीर झाला असुन श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा निकाल 95.45% तर प्रथम वर्षाचा निकाल 96%लागला आहे.
द्वितीय म्हणजे अंतिम वर्षात शिवाणी कुडाळकर (82.27%) ही विद्यार्थिनी महाविद्यालयात पहिली आली आहे. पुर्वा गावडे(81.64%) व संजना धुरी(80.9%) ह्या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या आहेत.
प्रथम वर्षात अक्षता जाधव(75.10%) ही विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रथम आलीं आहे. मृणालिका घाडिगांवकर (71.60%) ही विद्यार्थिनी द्वीतीय तर प्रफुल सावंत(71.00%) हा विद्यार्थी तृतीय आला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, संस्था पदाधिकारी , प्राचार्य डॉ.युवराज पांढरे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजचा डि. फार्मसीचा निकाल उल्लेखनीय
